CBI ची मोठी कारवाई ! इंजिनियर आणि त्याची पत्नी बनवत होते मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था CBI ने मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात करवाई करत 83 आरोपींविरूद्ध 23 प्रकरणे दाखल केली आहेत. या सर्व आरोपींवर मुलांचे लैंगिक शोषण आणि त्यांचे व्हिडिओ बनवून विकण्याचा आरोप आहे. या प्रकरणात CBI 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 76 ठिकाणी छापेमारी करत आहे.

 

मागील वर्षी सुद्धा झाली होती अटक

 

मागील वर्षी CBI ने अशाच प्रकारच्या प्रकरणात युपी सरकारमध्ये काम करत असलेला इंजिनियर राम भुवन यादव आणि त्याची पत्नी दुर्गावतीला अटक केली होती.
ते मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ बनवून डार्कनेटवर विकत होते.

 

अशाचप्रकारे CBI ने जम्मू काश्मीरमध्ये राहणार्‍या नियाज अहमद मीर याला सुद्धा अशाचप्रकारच्या आरोपात अटक केली होती.
जो अमेरिकेत राहणार्‍या आपल्या पत्नीद्वारे तेथील मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे डार्कनेटद्वारे परदेशात विकत होता.

 

FBI ला जेव्हा गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सीबीआय ला याबाबत माहिती दिली, ज्यानंतर अटकेची कारवाई झाली होती.

 

स्पेशल क्राईम युनिट

 

सीबीआय ने सुद्धा 2019 मध्ये मुलांच्या लैंगिक शोषणाची प्रकरणे गांभिर्याने घेत Online Child Sexual Abuse and Exploitation (OCSAE) Prevention/Investigation Unit स्थापन केले होते.
हे युनिट सीबीआयच्या स्पेशल क्राईम युनिट अंतर्गत काम करत आहे.
या युनिटचे काम मुलांच्या लैंगिक शोषणासंबंधी व्हिडिओ, फोटो विकणे आणि इंटरनेटवर अपलोड करणार्‍यांवर लक्ष ठेवणे आणि त्यांच्याविरूद्ध कारवाई करणे आहे.

 

सीबीआय इंटरपोलची भारतातील नोडल एजन्सी असल्याने सुद्धा मुलांच्या विरूद्ध होणारे क्राईम रोखणे आणि कारवाई करण्यात सुद्धा सीबीआय मदत करते.

 

कारण अशाप्रकारचे बहुतांश व्हिडिओ परदेशात डार्कनेटद्वारे विकले जातात आणि ते परदेशातून इंटरनेटवर अपलोड केले जातात.
परंतु मागील काही दिवसात भारतातून सुद्धा अशाप्रकारची प्रकरणे समोर येत आहेत.
ज्यानंती सीबीआयने हे स्पेशल युनिट स्थापन केले जेणेकरून मुलांविरूद्ध होत असलेले गुन्हे रोखता यावेत.

 

Web Title : CBI | cbi in action in child sexual abuse case raids in 14 states case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Trupti Khamkar | अभिनेत्री तृप्ती खामकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, ‘झोंबिवली’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Sushant Singh Rajput | दुर्देवी ! सुशांत सिंह राजपूतच्या 4 नातेवाईकांचा कार अपघातात मृत्यू

Kolhapur Crime | हनी ट्रॅपला कंटाळून 32 वर्षीय युवकाची आत्महत्या? सुसाईडपुर्वी चिठ्ठीत लिहिला मोबाईलचा Password