Cadbury india च्या विरोधात भ्रष्टाचार आणि Tax चोरीचा आरोप, CBI नं दाखल केलं आरोपपत्र !

Advt.

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कॅडबरी इंडिया (सध्या मोन्डेलेज फूड्स प्रा. लि.) ही डेअरी मिल्क चॉकलेट (Cadbury Dairy Milk Chocolate) तयार करणारी कंपनी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या विरोधात सीबीआयनं एक आरोपपत्र दाखल केलं आहे. हिमाचल प्रदेशात कारखान्याच्या लायसन्ससाठी कॅडबरी इंडियानं (Cadbury india ltd) खोटी कागदपत्रे दाखल केली आणि लायसन्ससाठी भ्रष्टाचाराच्या मार्गाचा वापर केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

सीबीआय (CBI) च्या प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे की, हिमाचलमधील बद्दी या भागात क्षेत्राच्या आधारावर करात सूट घेण्यासाठी, कागदपत्रांना चुकीच्या पद्धतीनं आणि चुकीच्या मार्गानं सादर करण्यासाठी कॅडबरी इंडियानं लाच दिली. हे स्पष्ट झाल्यानंतर सीबीआयनं कॅडबरी इंडियाच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं. सीबीआयनं या प्रकरणी 12 लोकांना अटक केली आहे. केंद्रीय एक्साईज खात्याच्या दोन अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. यात कॅडबरी इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट विक्रम अरोरा आणि संचालक राजेश गर्ग तसचं जेलबॉय फिलिप्स यांनाही अटक करण्यात आली आहे.

2009 ते 2011 या सालात अनियमितता

हिमाचल प्रदेशात कारखान्याच्या निर्मितीसाठी आणि आपल्या उद्योगासाठी कॅडबरी इंडियानं 241 कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्काचा अवैध पद्धतीनं लाभ उठवला आहे असं सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. हा व्यवहार 2009 ते 2011 या काळात झाला असल्याचंही सीबीआयनं सांगितलं आहे.

सीबीआयनं असंही म्हटलं आहे की, जे नियम आणि अटी असतात त्यांचं पालन कॅडबरी इंडियानं केलं नसून अवैध मार्गानं सगळ्या परवानग्या मिळवल्या आहेत. करात सूट मिळवण्यासाठी एका वेगळ्या कारखान्याची स्थापना न करता आहे त्याच कंपनीचा विस्तार केला अशी नोंदही सीबीआयनं त्यांच्या आरोपपत्रात केली आहे. इतकंच नाही तर करात सूट मिळावी या हेतूनं कॅडबरी इंडियानं कट ऑफ तारखेनंतर 4 महिन्यात जुलै 2010 साली दुसऱ्या कारखान्याचं लायसन्स मिळवलं होतं असंही सांगितलं गेलं आहे.