CBSE Board Exam 2020 : परीक्षेच्या काळातच सीबीएसई बोर्डानं बनवले ‘मजेदार’ मीम्स, पळून जाईल विद्यार्थ्यांचा ‘तणाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या विद्यार्थ्यांच्या बोर्डच्या परिक्षा सुरु आहेत. त्यामुळे ते तणावत आहेत. विद्यार्थी परिक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी मेहनत घेत आहेत. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन 2020 (CBSE) ने आपल्या अधिकृत ट्विटर हँटलवरुन फनी मिम्स शेअर केले आहेत.

हे मीम्स विद्यार्थ्यांवरील तणाव कमी करुन त्यांना त्यातून एक मेसेज देखील देत आहेत, जे विद्यार्थ्यांना परिक्षेदरम्यान प्रेरणा देण्यासाठी फायदेशीर ठरतील. सोशल मीडियावर हे मीम्स वेगाने व्हायरल होत आहेत.

हे मीम्स कार्टून कॅरेक्टरवर बेस्ड आहेत. यातून विशेष मेसेज देण्यात येत आहे. यात कार्टून कारेक्टरचे दोन मूड आहेत. एक आनंदी आणि एक तणावात. आनंदी असलेल्या समोर लिहिले आहे, दोन महिन्यांपूर्वी अभ्यास सुरु करणारे आणि तणावग्रस्त असलेल्या समोर, परिक्षेच्या 1 महिन्यापूर्वी अभ्यास करण्यास सुरुवात करणारे.

हे मीम्स पाहून हे स्पष्ट आहे की, जे विद्यार्थी परिक्षेपूर्वी 2 महिने आधी अभ्यास करतात ते परिक्षेवेळी आनंदी असतात आणि निवांत असतात. परंतु जे परिक्षेपूर्वी काही काळ अभ्यास करतात ते तणावात असतात.

असे पहिल्यांदाच होत आहे की, सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच मीम्स शेअर करत आहेत.