CBSE Board Exams 2021: सावधान ! 10 वी आणि 12 वी चे बनावट परीक्षा परिपत्रक व्हायरल; बोर्डाने दिली माहिती

पोलिसनामा ऑनलाईन – CBSE Board Exams 2021: CBSE बोर्ड परीक्षा २०२१ संदर्भात बनावट परीक्षा परिपत्रक सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जात आहे. आता CBSE ने आपल्या ट्विटर हँडलवरून ही बातमी ट्विट करून ही बातमी बनावट असल्याचे घोषित केले आहे. CBSE चे परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर आता परीक्षेच्या वेळापत्रकाबद्धल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत.

१ एप्रिल २०२० रोजी प्रसिद्ध केलेली CBSE अधिसूचना सोशल मीडियावर बनावट माहितीसह प्रसारित झाली. त्यात दावा केला जात आहे की आगामी CBSE बोर्डाच्या परीक्षांचे आयोजन आणि वेळापत्रक बदलले गेले आहे. या बनावट पोस्ट्संदर्भात CBSE ने म्हंटले आहे की, काही लोक यावर्षी (२०२१) होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांबद्धल मुदाम गोंधळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत १ एप्रिल २०२० ची जुनी बातमी प्रसारित होत आहे.

४ मे ते १० जून मध्ये होईल परीक्षा
CBSE ने म्हंटले आहे की विद्यार्थ्यांनी मागील वर्षाच्या जुन्या परिपत्रकाकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि दिशाभूल होऊ देऊ नये. मंडळाने अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. CBSE च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे ते १० जून दरम्यान घेण्यात येतील. मंडळाने याची पुष्टी केली आहे.

बोर्डाच्या वेबसाईटवर दिलेली माहिती योग्य
CBSE बोर्ड परीक्षा २०२१ मध्ये उपस्थित असलेल्या उमेदवारांना मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर आणि सोशल मीडिया हँडलवर दिलेली माहितीच स्वीकारावी असे सांगितले आहे. विद्यार्थींना इतर स्रोतांकडून मिळालेली माहिती स्वीकारू नये, असे सांगण्यात आले आहे.