CBSE च्या 1 ली ते 8 वी पर्यंत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! परीक्षा न देता पुढल्या वर्गात मिळणार प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीएसई बोर्डाच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय संसाधन मंत्री डॉ. रमेश पोखरिया निशंक यांनी बोर्डाला निर्देश दिले आहेत.


याशिवाय नववी आणि अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा विचार सुरु आहे. काही ठिकाणी नववी आणि अकरावी परीक्षा झाल्या आहेत. जेथे परीक्षा झाल्या नाहीत त्याबाबत लवकरच विचार करण्यात येईल. याशिवाय दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सीबीएसई बोर्डाने हे पाऊल उचलावे याबाबतचे निर्देश केंद्रीय मानव संसाधन मंत्री डॉ. निशंक यांनी दिले.

मानव संसाधान मंत्री डॉ. रमेश पोखरिया निशंक यांनी शिक्षा सचिव अमित खरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, कोरोनाच्या दृष्टीकोनातून सीबीएसईने पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा. असा सल्ला त्यांनी दिला आहे. बऱ्याच राज्य मंडळांनी यापूर्वीच अशी घोषणा केली आहे. मात्र, सीबीएसईने अद्याप कोणताच निर्णय घेतला नव्हता.