Coronavirus 2nd Wave Update : कोरोना व्हायरस खुपच ‘पावरफूल’ ! लोकांनी जास्त वेळ घराच्या बाहेर राहू नये; अमेरिकेतील ‘या’ मोठया संस्थेनं केलं कळकळीचं आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. आवश्यक त्या आरोग्य सेवा-सुविधा मिळत नसल्याने अनेक रुग्णही दगावत आहेत. त्यातच आता नवी माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरस हा जास्त शक्तिशाली असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच जास्त वेळ घराबाहेर पडू नका, असे म्हटले आहे.

यूएस ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन’ने (CDC) सांगितले, की हवेमुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने होतो. जास्त वेळ घराबाहेर राहणाऱ्या लोकांवर थेट याचा परिणाम होतो. सहा सदस्यीय तज्ज्ञांच्या पथकाने अभ्यासात आढळले की हा एक एअरबोर्न आहे. मात्र, भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याचा नकार दिला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, व्हायरस व्यक्तीपासून व्यक्तीत पसरतो.

जास्त पॉवरफुल आहे व्हायरस

यूएस ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन’ने स्वीकार केला की कोविड-19 च्या कारणाने सार्स-कोव-2 बनतो. हवारहित व्हायरस श्वास घेण्यादरम्यान निघणाऱ्या महीन थेंबाच्या रुपात एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रवेश करतो. एकदा शरीरात प्रवेश करतो तेव्हा संक्रमण पसरवणे सुरु करतो.

अभ्यासात झाला खुलासा…

व्हायरसला हवेत होणाऱ्या सार्स-कोव-2 ट्रान्समिशनवर फोकस केला. दिशा-निर्देशांमध्ये सांगितले, की लोक जेव्हा श्वास सोडतात किंवा कोणाशी बोलतात तेव्हा कोरोना व्हायरस हवेत मिसळतो आणि मोठ्या कालावधीसाठी सक्रीय राहतो.

कामाच्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज

तज्ज्ञांच्या मते, यावेळी बंद खोलीत आणि कार्यालयात कोरोना व्हायरस पसरण्याठी नवी जागा बनू शकते. व्हायरस हवेत छोट-छोट्या कणांमध्ये अनेक तासांपर्यंत जीवंत राहतो. बंद जागांवर तो जीवंत राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच ज्या ऑफिसमध्ये जास्त कर्मचारी जात असतात त्यांना जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे. एक संक्रमित कर्मचारी शेकडो कर्मचाऱ्यांसाठी अडचण निर्माण करू शकतो.