२९ सप्टेंबर सर्जिकल स्ट्राइक डे म्हणून पाळा; युजीसीचा विद्यापीठांना आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना २९ सप्टेंबर हा दिवस सर्जिकल स्ट्राइक डे म्हणून पाळण्याचे आदेश दिले आहेत. या दिवशी सशस्त्र दलांतील जवानांच्या बलिदानाबाबत माजी सैनिकांचे संवाद सत्र, विशेष परेड, प्रदर्शनांचे आयोजन करण्यात यावे. तसेच सशस्त्र दलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शुभेच्छा पत्रे पाठवावीत, असेही युजीसीने आदेशात म्हटले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’827bdd5f-bd57-11e8-82e0-abaf665a707d’]

२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडे जाऊन दहशतवाद्यांच्या सात तळांवर हल्ले करीत सर्जिकल स्ट्राइक केले होते. विशेष दलाच्या या कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरीच्या तयारीतील दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले होते. या सर्जिकल स्ट्राइकचा वापर सत्ताधारी भाजपने आपले मार्केटिंग करण्यासाठी मोठ्या खुबीने करून घेतला होता. जेव्हा सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले होते त्यावेळी देशभरात अनेक ठिकाणी बॅनर्स लावून शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपही झाले होते. आता सर्जिकल डे साजरा करण्यासाठी युजीसीने पुढाकार घेतला असून तसे पत्र सर्व विद्यापीठांना पाठवले आहे.

भारत आता इराणमधून भारतीय चलनात तेल आयात करणार

युजीसीने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना यासंबंधी पत्र पाठवले असून या पत्रात म्हटले आहे की, विद्यापीठांतील एनसीसीच्या कॅडेट्सची २९ सप्टेंबर रोजी विशेष परेड घ्यावी. परेडनंतर एनसीसी कमांडर यांनी सीमेच्या संरक्षणासंबंधी कॅडेट्सना संबोधित करावे. दिल्लीतील राजपथावरील इंडिया गेटजवळ २९ सप्टेंबर रोजी एक दृकश्राव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. अशाच प्रकारची प्रदर्शने राज्ये, केंद्रशासित प्रदेश, महत्वाची शहरे, देशातील लष्करी छावण्यांमध्ये देखील भरविण्यात यावीत. ही प्रदर्शने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारी असावीत असेही या पत्रात म्हटले आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4ed39234-bd58-11e8-b5c2-7b3596bee8af’]