महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी 1636 स्टेशन लावणार मोदी सरकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारने FAME इंडिया स्कीम अंतर्गत 24 राज्यांमध्ये 62 शहरात 2,636 चार्जिंग स्टेशन लावण्यास मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की यामुळे इलेक्ट्रिक व्हिकल मॉडल्सला ओरिजिनल मॅन्युफॅक्चरर्सला प्रोस्ताहन मिळेल. फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या फेज अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ हेवी इंडस्ट्रीजने एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागितले होते, जेणे करुन या शहरात चार्जिंग स्टेशन लावण्यात येईल.

प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की या चार्जिंग स्टेशनला इन्सटॉल करण्यात आल्यानंतर अपेक्षा आहे की या काही निवडक शहरात 4km x 4 km दरम्यान चार्जिंग स्टेशन उपलब्ध होऊ शकेल. इलेक्ट्रिक वाहन खरेदीला लोक पसंती देताना दिसते आहेत. 


कोणत्या राज्यात किती चार्जिंग स्टेशनला मंजुरी –
फेम इंजिया या योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सर्वात आधिक म्हणजे 317 चार्जिंग स्टेशन, आंध्रप्रदेशात 266, तमिळनाडूमध्ये 256, गुजरातमध्ये 228, राजस्थानमध्ये 207, कर्नाटकात 172, मध्य प्रदेशात 159, पश्चिम बंगालमध्ये 141, तेलंगणात 138, केरलमध्ये 131, दिल्लीत 72, हरियाणामध्ये 50, मेघालयात 40, बिहारमध्ये 37, सिक्किमध्ये 29, जम्मूमध्ये 25, श्रीनगरमध्ये 25, छत्तीसगढमध्ये 25, आसाममध्ये 20, ओडिसामध्ये 18, उत्तराखंड, पाँडेचेरी, हिमाचल प्रदेशात प्रत्येकी 10 इलेक्ट्रिक व्हेहिकल चार्जिंग स्टेशन बसवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या चार्जिंग स्टेशनसाठी जमीन उपलब्ध करुन देण्यात आल्यानंतर टप्प्याटप्याने मंजुरी पत्र देण्यात येईल. 

106 जागेहून मिळाले प्रस्ताव –
अवजड उद्योग मंत्रालयाने मोठ्या शहरात स्मार्ट शहरं आणि राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानींकडून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागितला होता. यानंतर जवळपास 106 जागांहून सरकारला प्रस्ताव देखील आले. ज्यात 7 हजार इलेक्ट्रिक वाहनासाठी चार्जिंग स्टेशन बनवण्याचे सांगितले आहे. 

 

1633 स्टेशनवर होणार फास्ट चार्जिंगची सुविधा –
एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टचे मुल्यांकन करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने 2,636 चार्जिंग स्टेशनला मंजुरी दिली होती. ज्यांना मंजुरी मिळाली त्यात 24 राज्यांतील 19 सार्वजनिक भागांचा समावेश आहे. यात 1,633 चार्जिंग स्टेशन फास्ट चार्जिंग स्टेशन आहेत तर 1,003 स्लो चार्जिंग स्टेशन आहेत. निवडक शहरात जवळपास 14,000 चार्जर्स इन्स्टॉल करण्याची तयारी सुरु आहे. 


फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/