अर्धसैनिक दलात वेगाने पसरतोय ‘कोरोना’ व्हायरस, आतापर्यंत 50 हजार जवानांना संसर्ग

नवी दिल्ली : भारतात कोविड-19 च्या व्हॅक्सीनवर काम वेगाने सुरू आहे. या संसर्गाचे आकडे सामान्य लोकांमध्ये वेगाने वाढतच आहेत. सोबतच कोरोनाच्या लढाईत फ्रंटलाइनवर काम करत असलेल्या अर्धसैनिक दलांमध्ये (सीएपीएफ) सुद्धा हा संसर्ग वाढत आहे. आतापर्यंत 50 हजारपेक्षा जास्त सीएपीएफचे जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अधिकृत आकड्यांनुसार, 10 डिसेंबरपर्यंत सेंट्रल रिझर्व्ह पोलीस (सीआरपीएफ) आणि सेंट्रल इंडस्टियल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ) सह दुसर्‍या केंद्रीय फोर्सेसचे 50 हजार 10 जवान कोरोना संक्रमित आढळले आहेत. तर, कोरोनामुळे जीव गमावणार्‍या जवानांची संख्या 185 आहे.

सर्वात जास्त सीआरपीएफच्या जवानांना संसर्ग झाला आहे. सीआरपीएफचे 14 हजार 461 जवान पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, 75 जवानांनी या संसर्गामुळे जीव गमावला आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) संसर्गाच्या बाबतीत दुसर्‍या नंबरवर आहे. यांचे 14 हजार 101 जवान संक्रमित झाले आहेत आणि 44 जणांचा मृत्यू झाला आहे. बीएसएफ देशातील दुसरा सर्वात मोठा पॅरा मिलिट्री फोर्स आहे.

कुठे-कुठे तैनात आहेत जवान?
केंद्रीय दलांमध्ये 10 लाखांपेक्षा जवान सध्या आपली सेवा देत आहेत. यामध्ये सीआयएसएफ जवानांची संख्या सर्वात जास्त आहे. सीआयएसएफचे जवान देशातील एयरपोर्ट, रेल्वे स्टेशन, मेट्रो आणि सरकारी इमारतींच्य सुरक्षेत तैनात आहेत.

सुरक्षादलांना दिली जाईल कोरोना व्हॅक्सीन
देशात कोरोना व्हॅक्सीनवर वेगाने काम सुरू आहे. मंत्रालयानुसार, सध्या 8 व्हॅक्सीनवर काम सुरू आहे. सरकारने कोविड व्हॅक्सीन तयार झाल्यानंतर केंद्रीय फोर्सेसला ती प्रथम देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी नुकतेच यासाठी देशातील सर्व सेंट्रल फोर्सेसच्या प्रमुखांसोबत बैठक केली होती. गृह मंत्रालयाने सर्व केंद्रीय दलांना फ्रंटलाइनवर सेवा देणार्‍या जवानांची माहिती मागितली आहे.