कारचालकांसाठी सरकारचा महत्वाचा प्रस्ताव, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने भारतातील वाहनांसाठी फ्रंट-साईड एअरबॅग्ज (Front-side airbags) अनिवार्य करण्याचा प्रस्ताव पाठवून याबाबत जनतेचा अभिप्राय मागविला आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Union Ministry of Road Transport and Highways) जारी केलेल्या प्रस्तावात देशातील सर्व नवीन व विद्यमान वाहनांमध्ये पुढचे एअरबॅग अनिवार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेस चालना देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) पुढच्या प्रवाश्यासाठी अनिवार्य एअरबॅग प्रस्तावित केले आहेत. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या नव्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित अंतिम मुदत नवीन मॉडेलसाठी 1 एप्रिल 2021 आणि विद्यमान मॉडेल्ससाठी 1 जून 2021 अशी निश्चित करण्यात आली आहे.”

कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेस चालना देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पुढच्या प्रवाश्यासाठी अनिवार्य एअरबॅग प्रस्तावित केले आहेत. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या नव्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित अंतिम मुदत नवीन मॉडेलसाठी 1 एप्रिल 2021 आणि विद्यमान मॉडेल्ससाठी 1 जून 2021 अशी निश्चित आहे.” निवेदनात लिहिले की यासंदर्भात सर्व संबंधितांना पुढील एक महिन्यात सूचना देण्यास सांगितले आहे.

केंद्र सरकारने जुलै 2019 पासून वाहनचालकांसाठी एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत. मंत्रालयाच्या अधिसूचनेत असे लिहिले आहे की, “प्रवाशांच्या सुरक्षेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय म्हणून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनच्या पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाला अनिवार्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

एअरबॅग द्याव्यात

“ड्रायव्हरजवळ बसलेल्या प्रवाशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी फक्त एकच सीट बेल्ट पुरेसा होईल की एअरबॅग अनिवार्य करणे आवश्यक आहे यावर परिवहन मंत्रालय चर्चा करीत आहे. एका अधिका -याने सांगितले की, पुढच्या सीटवरीलसह-प्रवाशाला एअरबॅग देखील लागू कराव्यात असा निर्णय घेण्यात येणार आहे.