तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी सज्ज रहावे जि.प.चे CEO उदय जाधवांचं आवाहन

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन ( मोहंंम्मदगौस आतार ) – नीरा -निंबुत परिसरात ज्युबिलंट कंपनी राबवित असलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहे.

विद्यार्थ्यांनी टॅबचे चांगले प्रशिक्षण घ्यावे . टॅबचा चांगला उपयोग करून तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी सज्ज रहावे असे आवाहन पुणे जि.प.चे सीईओ उदय जाधव यांनी विद्यार्थ्यांना केले.

गुळूंचे (ता.पुरंदर) येथे ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशन व ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कं.नीरा – निंबुत यांच्या वतीने शनिवारी (दि.१८) मुस्कान डिजी मित्र या प्रकल्पाचा उद्घाटन व शैक्षणिक टँबचे
वितरण पुणे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुणे जि.प.चे.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी अमर माने, ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कं.चे उपाध्यक्ष सतिश भट, जि.प.सदस्य प्रमोदकाका काकडे, जि.प.सदस्या शालिनी पवार, माजी सभापती अजित निगडे, पुरंदरचे सहाय्यक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, पुरंदरचे गटविकास अधिकारी रामदास वालझडे, नारायणभाऊ निगडे, गुळूंचेचे सरपंच संभाजी कुंभार, उपसरपंच संतोष निगडे, कर्नलवाडीचे सरपंच सुधीर निगडे, शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश लांघी, विक्रम शिंदे, ज्युबिलंटचे मनुष्यबळ विकास अधिकारी दिपक सोनटक्के, जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर, नीरा व परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

जाधव पुढे म्हणाले की, नीरा -निंबुत येथील ज्युबिलंट कंपनीने शासनाच्या तीन टक्के सीएसआर च्या पुढे जाऊन कंपनीच्या परिसरातील गावांचा आणखी सामाजिक विकासासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले.

सतिश भट म्हणाले की, नीरा -निंबुत परिसरातील विद्यार्थ्यांना ई-लर्निंग शिकण्यासाठी टँब देण्याचे ब-याच दिवसांचे स्वप्न होते ते आज पुर्ण आले असून या ई-लर्निंग शिक्षणातून मुले चांगली घडतील असा विश्वास व्यक्त करून गेल्या अनेक वर्षापासून परिसरात आरोग्य , शिक्षण, महिलांसाठी कोर्सेस यासाठी फाऊंंडेशन कार्यरत आहे. तसेच ग्रामीण विकास कार्यक्रम यावर अधिक भर दिला असून यापुढेही कंपनी परिसरातील गावांचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फाऊंडेशनचे अजय ढगे यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले. मनुष्यबळ विकास अधिकारी दिपक सोनटक्के यांनी आभार मानले.

या शाळांना टॅब चे झााले वितरण….
ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशनने विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी संगणकीय वापराबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी मुस्कान डिजी मित्र हा उपक्रम सुरू करण्यात आला असून त्या अंतर्गत नीरा-निंबुत परिसरातील जिल्हा परिषद शाळा नीरा.नं.१, नीरा नं.२, शिवतक्रारवाडी, ज्युबिलंट इंग्लिश मिडियम स्कूल, पिंपरे खुर्द, गुळूंचे, कर्नलवाडी तसेच बारामती तालुक्यातील निंबुत, निंबुत छप्री, लक्ष्मीनगर, कन्हेरवाडी, पठारवस्ती, कोळेवस्ती, पाडेगांव, पाडेगांव फार्म आदी १५ शाळांना टँब व स्क्रीनचे विद्यार्थ्यांना ई- लर्निंगच्या शिक्षणासाठी वाटप करण्यात आले. यामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ई- लर्निंगचेे शिक्षण देण्यात येणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तीन पदवीधरांना लँपटाँप , प्रोजेक्टर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/