Pune Crime News | कोथरूडच्या परमहंसनगरमध्ये 23 वर्षीय महिलेच्या गळयातील 50 हजाराचे दागिने हिसकावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  कोथरूड (Kothrud) भागात घराजवळ असलेल्या मेडिकल दुकानात औषध आण्यास जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 50 हजार रुपयांचे मंगळसूत्र (Mangalsutra of 50 thousand rupees) जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. सव्वा आठ वाजता ही घटना घडली आहे.

याप्रकरणी 23 वर्षीय महिलेने कोथरूड (Kothrud) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद या परमहंसनगर भागात राहतात.
त्या गुरूवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घराशेजारी असणाऱ्या मेडिकलमध्ये औषध असण्यास जात होत्या.
त्या पायी चालत जात असताना पाठीमागून दुचाकीवर एकजण त्यांच्याजवळ आला.
त्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील 50 हजार रुपयांचे मंगळसूत्र (Mangalsutra of 50 thousand rupees) जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले.
त्यांनी आरडाओरडा केला.
मात्र चोरटा पसार होण्यात यशस्वी झाला आहे.
अधिक तपास कोथरूड (Kothrud) पोलीस करत आहेत.

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांकडून My Pune Safe अ‍ॅपची निर्मिती, जाणून घ्या वैशिष्ट्ये अ‍ॅपचे फीचर

पुणे देशातील एक महत्त्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं. देशातील बरेच युवक शिक्षण आणि नोकरीसाठी पुण्यात येऊन स्थायिक होतं आहेत. या कारणाने मागील काही वर्षांपासून पुण्याची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. शहरात घडणाऱ्या घटनांची तत्काळ माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘My Pune safe’ नावाच्या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. यासोबतचं पोलीस प्रशासना बदली अ‍ॅपची निर्मिती देखील केली आहे.

दरम्यान, या दोन्ही अ‍ॅपचे उद्धाटन नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.
या अ‍ॅपमुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसू शकतो, अशा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
या अ‍ॅपची पुणेकरांनाही खूप मदत होणार आहे. ‘माय पुणे सेफ’ My Pune safe ॲप आणि बदली सॉफ्टवेअरची निर्मिती पुणे शहर पोलीस (Pune City Police) आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासोबतचं बदली सॉफ्टवेअर पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे.
यामुळे कर्मचाऱ्यांना प्रशासकीयदृष्टया पारदर्शकपणे मनासारखी बदली करून घेण्यास मदत होणार आहे.

My Pune Safe ॲपची वैशिष्ट्ये

1. पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
त्यामुळे शहरात सध्याच्या घडीला काय सुरू आहे.
याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
पोलिसांच्या दैनंदिन गस्तीसाठी हे अ‍ॅप खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

2. परिमंडळ चारचे पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे ॲप बनवण्यात आलं आहे.

3. या अ‍ॅपच्या मदतीने गस्तीदरम्यान गुन्ह्यांना त्वरित आळा घालता येणार आहे.

4. गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी एखाद्या ठिकाणी भेट दिल्यानंतर संबंधित ठिकाण सेफ असल्याचा पुरावा म्हणून My Pune Safe अ‍ॅपवर सेल्फी अपलोड करता येणार आहे.

5.  या ॲपवरुन पोलीस नियंत्रण कक्ष पुणे शहर यांना सदरचे बिट मार्शल कोणत्या भागामध्ये गस्तीवर आहे याची माहितीही उपलब्ध होणार आहे.

6. बिट मार्शलने कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी भेट दिली ? याची सर्व माहिती कायमस्वरुपी ॲपमध्ये उपलब्ध राहणार आहे.

7.  दरम्यान संबंधित ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश आणि वेळ नोंद आदी सर्वांची नोंद केली जाणार आहे.

Pune News | मुलगा होत नसल्याने आत्महत्येस केलं प्रवृत्त, माहेरच्यांनी पतीच्या घरासमोर जाळला महिलेचा मृतदेह, तिघांविरोधात FIR

दुर्दैवी ! शेतात बैलगाडी उलटल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, लातूर जिल्ह्यातील घटना