Chanakya Niti About Money : चुकूनही ‘अशा’ धनाची बाळगू नये इच्छा, होतं ‘हे’ नुकसान, जाणून घ्या काय सांगते ‘चाणक्य नीती’

पोलीसनामा ऑनलाईन : प्रत्येक माणसाला धन प्राप्त करण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो बर्‍याचदा चुकीचा मार्ग देखील वापरतो. अशा परिस्थितीत चाणक्य यांनी धन प्राप्त करण्यासंबंधित अनेक गोष्टी आपल्या चाणक्य नितीमध्ये सांगितल्या आहेत. ते सांगतात की कशा प्रकारे कर्माने धनाची प्राप्ती केली जाऊ शकते आणि कोणते काम धनप्राप्तीसाठी चुकीचे आहेत. चाणक्यांच्या या नीतींबद्दल जाणून घेऊया…

अतिक्लेशेन ये चार्था धर्मस्यातिक्रमेण तु।
शत्रूणां प्रणिपातेन ते ह्यर्था मा भवन्तु मे।।

चाणक्य या श्लोकात असे म्हणतात की, जे धन दुसर्‍यांचे नुकसान करुन आणि दुसऱ्यांना दु:ख देऊन, धर्माविरूद्ध काम करून, शत्रूसमोर हात पसरून प्राप्त होते, असे धन मला नको आहे. असे धन माझ्याकडे न आलेलेच बरे.

आचार्य यांना म्हणायचे आहे की माणसांनी अशा संपत्तीची इच्छा धरू नये, जी इतरांना इजा पोहोचवून गोळा केली गेली असेल. धर्माविरूद्ध काम करून आणि शत्रूसमोर हात जोडून मिळवलेले धन कुचकामी आणि अपमानास्पद असते. माणसाने अशी संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न कधीही करू नये. त्याने नेहमीच परिश्रम आणि चांगल्या उपाययोजनांद्वारे धन गोळा केले पाहिजे. शुभ धन हेच शुभत्व देते.

किं तया क्रियते लक्ष्म्या या वधूरिव केवला |
या तु वेश्येव सा मान्या पथिकैरपि भुज्यते।।

चाणक्य नितीच्या या श्लोकात आचार्य म्हणतात की अशा धनापासून कोणताही लाभ होत नाही, जे कुलवधूप्रमाणे फक्त एका मनुष्यासाठीच उपभोग्य वस्तू असेल. धन-संपत्ती तर तीच श्रेष्ठ असते, जिचा फायदा सर्वांना होऊ शकेल, म्हणजेच ती धन-संपत्ती श्रेष्ठ असते, जी इतर लोकांच्याही कामात येते.

या श्लोकाचा अर्थ असा आहे की सर्वात चांगली संपत्ती ती आहे जी परोपकाराच्या कामात वापरली जाते. ज्या संपत्तीला कोणता एक व्यक्ती गोळा करून बसतो, त्या संपत्तीला ना उपयुक्त मानले जाते आणि त्यापासून ना कुणाला फायदा होतो. समाजकल्याणात वापरलेली संपत्ती हेच श्रेष्ठ धन आहे. धनाची गती कधीही थांबलेली असू नये.