Chandni Chowk Flyover | चांदणी चौक पुल पाडण्याचे काम अंतिम टप्प्यात, परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कामाचा आढावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandni Chowk Flyover | जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Pimpri Chinchwad CP Ankush Shinde) यांनी चांदणी चौक (Chandni Chowk Flyover) परिसराला भेट देऊन तेथील जूना पूल पाडण्याच्या कामाच्या अंतिम तयारीबाबत माहिती घेतली. त्यांच्या समवेत पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (Traffic Branch DCP Rahul Shrirame), एनएचएआयचे (NHAI) प्रकल्प संचालक संजय कदम (Sanjay Kadam), संबंधित यंत्रणेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

चांदणी चौक पूल (Chandni Chowk Flyover) पाडण्यापूर्वी 200 मीटरचा परिसर सायंकाळी 6 वाजता निर्मनुष्य करावा. वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी आवश्यक पोलीस कर्मचारी नेमावेत. पूल पाडल्यानंतर राडारोडा नियोजित वेळेतच बाजूला केला जाईल याची विशेष दक्षता घ्यावी आणि त्यासाठी गरज असल्यास अतिरिक्त वाहने आणि मनुष्यबळ तैनात करावे, असे निर्देश डॉ.देशमुख यांनी दिले.

बाहेरून येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाविषयी माहिती देण्यासाठी एनएचएआयने महामार्गावर ठिकठिकाणी माहितीचे फलक लावावेत. बावधन परिसरातील लहान रस्त्यांवर वाहतूक नियोजनासाठी पोलीस कर्मचारी नेमण्यात यावेत. आवश्यतेतनुसार आपत्कालीन नियोजन तयार ठेवावे, असे निर्देश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले. पोलीस उपायुक्त श्रीरामे यांनी पूल पाडण्याच्या वेळेत करण्यात येणाऱ्या वाहतूक नियोजनाची माहिती दिली.

असा पाडला जाईल जूना पूल

पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण 35 मिमी व्यासाचे 1 हजार 300 छिद्र पाडण्यात आले आहे. 600 किलो इमल्शन स्फोटकांचा (Emulsion Explosives) उपयोग करण्यात येणार आहे. 1 हजार 350 डिटोनेटरचा उपयोग नियंत्रित पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी करण्यात येणार आहे. ब्लास्ट एक्सपर्ट आनंद शर्मा (Blast expert Anand Sharma) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे करण्यात येत आहेत. रविवारी (2 ऑक्टोबर रोजी) पहाटे सर्व तयारी वेळेवर झाल्यास पहाटे 1 ते 2 च्या दरम्यान पूल पाडण्यात येईल.

पूल पाडतांना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये यासाठी 6 हजार 500 मीटर चॅनल लिंक्स, 7 हजार 500 वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, 500 वाळूच्या पिशव्या आणि 800 वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून 200 मीटर परिघातील इमारतीतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार आहे.

पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री

पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपयोगात आणली जात आहे. 16 एक्स्कॅव्हेटर, चार डोजर, चार जेसीबी, 30 टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, 2 अग्निशमन वाहन, 3 रुग्णवाहिका, 2 पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण 210 कर्मचारी संबंधित यंत्रणतर्फे नियुक्त करण्यात आले आहेत.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण 3 पोलीस उपायुक्त, 4 सहायक आयुक्त (ACP),
19 पोलीस निरीक्षक (PI), 46 सहायक पोलीस निरीक्षक (API) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) तसेच
355 पोलीस कर्मचारी असे एकूण 427 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त् करण्यात आले आहेत.
नागरिकांनी पूल पाडण्याच्या वेळेत चांदणी चौक परिसरात येऊ नये आणि पोलीसांनी दिलेल्या
वाहतूक विषयक सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी केले आहे.

Web Title :- Chandni Chowk Flyover | The District Collector reviewed the Chandni Chowk flyover work

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | प्रेमात झाला धोका, ट्रेनवर चढून ओव्हरहेड वायर धरली; पुणे स्टेशनमधील धक्कादायक प्रकार

CM Eknath Shinde | मिलिंद नार्वेकर सुद्धा शिंदे गटात जाणार? एकनाथ शिंदेंनी दिले उत्तर, म्हणाले – माझं वागणं पोटात एक, आणि ओठात एक नसतं!

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 5 लाखाचा भेसळयुक्त गुळ व साखर जप्त