Chandrakant Khaire | चंद्रकांत खैरे भाषणाला उभे राहिले आणि लोकांनी खुर्च्या सोडल्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने पक्षबांधणीसाठी महाप्रबोधन यात्रा सुरु केली आहे. औरंगाबादमध्ये शुक्रवारी रात्री महाप्रबोधन यात्रेनिमित्त सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushman Andhare) यांचे भाषण झाले. त्यानंतर चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) भाषणासाठी उभे राहिले. पण, ते भाषणाला येताच लोकांनी खुर्च्या सोडल्या आणि चालायला लागले. त्यामुळे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना नतमस्तक होत सर्वांचे आभार मानावे लागले. त्यांना भाषणाची संधी मिळाली नाही.

महाप्रबोधन यात्रेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)यांना सभेत बोलण्याची संधी मिळाली नाही. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे भाषण संपताच उपस्थितांनी खुर्च्या सोडल्या. त्यामुळे भाषणासाठी उठलेल्या खैरे यांना जनतेसमोर नतमस्तक व्हावे लागले. यावर खैरे यांची प्रतिक्रिया घेतली असता, खैरे यांनी जनता आमच्या पाठीशी उभी राहिली आणि एवढा वेळ झाला तरी आमच्यासाठी थांबले यासाठी नतमस्तक होऊन जनतेचे आभार मानले, असे मत व्यक्त केले.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक आमदार, खासदार पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची साथ सोडली.
त्यामुळे शिवसेनेला आता पुन्हा नव्याने पक्षबांधणी करण्याची वेळ आली आहे.
त्यांच्यासोबत काही नवे नेते आणि संघटना जोडल्या गेल्या आहेत.
त्यातील एक आंबेडकरी चळवळीतील सुषमा अंधारे या आहेत.
त्यामुळे त्या सध्या शिवसेनेच्या आघाडीच्या प्रचारक आहेत. लोक त्यांची भाषणे ऐकण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांना भाषण करता आले नाही. शिवसेनेला अनेक नेते आणि खासदार सोडून गेले, तरी चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेची साथ सोडली नाही. ते शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेत शिवसेनेचा प्रचार करत आहेत.

Web Title :-Chandrakant Khaire | shivsena chandrakant khaire does not get a chance to speak during shivsenas mahaprabhodana yatra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | ‘आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार’ – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Pune Crime | कोकण ट्रिपमधील ओळखीतून मुलाला मारुन टाकण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार; टिंगरेनगरमधील महिलेची विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद