Chandrakant Patil – Ajit Pawar | पुण्यात चंद्रकांत पाटील तर कोल्हापूरात अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil – Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सामिल होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री पद (Guardian Minister) अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, आज स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्यांच्या मुख्यालयात ध्वजारोहण करणाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार आहेत. (Chandrakant Patil – Ajit Pawar)

15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा (Indian Independence Day) 76 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण (Flag Hoisting) करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी राज्य सरकारने जाहीर केली आहे. (Chandrakant Patil – Ajit Pawar)

अजित पवार कोल्हापूरचे पालकमंत्री

राज्य शासनाने जाहिर केलेल्या परित्रकानुसार राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर येथे
ध्वजारोहण करणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नागपूर येथे ध्वजारोहण करणात आहेत.
याशिवाय छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)- अमरावती, सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) – चंद्रपूर,
दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil)-वाशिम, राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)-अहमदनगर,
हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) – सोलापूर येथे ध्वजारोहण करणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kirloskar Cummins Employees Union | कामगार चळवळीला जिवंत ठेवण्याची आवश्यकता; यशवंत भोसले यांचे प्रतिपादन