Chandrakant Patil On Girls Education | मुलींच्या मोफत उच्च शिक्षणासंबंधी मंत्री चंद्रकांत पाटील यांची महत्वाची घोषणा, ”येत्या जूनपासून…”

जळगाव : Chandrakant Patil On Girls Education | राज्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुलींच्या मोफत उच्च शिक्षणासंबंधी आज महत्वाची घोषणा केली. ते जळगावमधील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलत होते. विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधताना त्यांनी वरील माहिती दिली. (Chandrakant Patil On Girls Education)

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यातील मुलींना अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, वैद्यकीयसह इतर अभ्यासक्रमांना जून २०२४ पासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.

चंद्रकांत पाटील म्हणाले, जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. जवळपास ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू असेल.

तत्पूर्वी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे
आणि नव्याने सुरु झालेल्या योगशास्त्र पदव्युत्तर विभागाचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात संदर्भात विद्यापीठ करत
असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nikhil Wagle In Pune | पुण्यात भाजपचे कार्यकर्ते निखिल वागळेंविरोधात आक्रमक, वागळेंची गाडी फोडली, अंडी आणि शाईफेक (Video)

Raj Thackeray | बाळासाहेबांना भारतरत्न घोषित करण्याची राज ठाकरेंची मागणी, म्हणाले – ”तमाम हिंदूंची अस्मिता जागृत…”

जास्तीचा फायदा करुन देण्याच्या बहाण्याने 15 जणांची 8 कोटींची फसवणूक, आरोपीला हिंजवडी पोलिसांकडून अटक