Chandrakant Patil On Maharashtra Karnataka Border Issue | सीमावादावरील गावांसाठी 2 दिवसांत मोठी घोषणा – चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil On Maharashtra Karnataka Border Issue | सीमा भागातील गावांचा प्रश्न पुन्हा एकदा वर आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि अक्कलकोट भागांतील कन्नड भाषिक प्रातांवर दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्रातील राजकारणी टीका करत आहेत. आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सीमाभागातील गावांच्या प्रश्नांवर तोडगा काढणार असल्याचे सांगितले आहे. सीमा भागांवरील गावांवर दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

सीमाभागातील गावांना कायद्याच्या चौकटीत राहून लवकरच सुविधा देण्यात येणार आहेत. या सीमा प्रश्नावर चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांनी पुढाकार घ्यावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची समिती गठीत केली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांनी त्यांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले होते. सर्व विरोधी पक्षांनी भाजप आणि शिंदे सरकारवर आगपाखड केली होती. यावर आता चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

पाटील म्हणाले, आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना झाली आहे. बेळगाव, कारवार,
निपाणीसह 865 मराठी भाषिक गावांतील मराठी नागरिकांवर अन्याय झाला. त्यांना कर्नाटकात जावे लागले आहे.
त्यावर महाराष्ट्र सरकार न्याय मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. या गावांतील मराठी भाषिक,
विशेषत: युवक युवतींसाठी कायद्याच्या चौकटीत राहून खास सोयीसुविधा, सवलती देण्यात येतील.
यावर लवकरच घोषणा केली जाईल. सांगली पूर्व भागातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या भागांना
टेंभू – ताकारी – म्हैसाळ पाणीपुरवठा योजनेतून पाणी दिले जात आहे.
याच योजनेतून सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी भागांना पाणी देण्यात येईल.

Web Title :- Chandrakant Patil On Maharashtra Karnataka Border Issue | big announcement in two days for border villages chandrakant patil in pune Chandrakant Patil On Maharashtra Karnataka Border Issue

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने लॉकअपमध्ये घेतले डोके फोडून; ससूनमध्ये गळ्यावर काचेने जखमा करुन केला आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime | दहशत पसरविण्यासाठी टोळक्याने केला लोहगाव परिसरात गोळीबार, 3 राऊंड केले फायर