Chandrakant Patil On SRA In Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनांचा आढावा

पुणे : Chandrakant Patil On SRA In Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या Slum Rehabilitation Authority (SRA) विविध योजनांचा आढावा घेतला. (Chandrakant Patil On SRA In Pune)

यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे (Neelesh Gatne IAS), अप्पर जिल्हाधिकारी वैशाली इंदानी-उंटवाल (Vaishali Indani-Untwal), प्रकल्पाशी संबंधित विकसक व रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकंमत्री पाटील म्हणाले, दांडेकर पूल झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (Dandekar Pool SRA) पात्र १९ लाभार्थ्यांना
येत्या महिन्याभरात घरभाडे वाढवून देण्याची विकासकाने कार्यवाही करावी.
श्री पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्थेबाबत उच्च न्यायालयातील (Mumbai High Court) प्रकरणाच्या
अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढण्यात येईल.
त्याअनुषंगाने झोपडपट्टी पुनर्वसन प्रशासनाने कार्यवाही करावी.
गुजरात कॉलनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अनुषंगाने इमारतीची उंची ५६ मीटर पर्यंत वाढविण्याबाबत
आलेल्या प्रस्तावाबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी
झोपडपट्टी पुनर्वसन प्रशासनाला दिल्या. (Chandrakant Patil On SRA In Pune)

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांनी योजनांबाबत माहिती दिली.

पर्वती येथील दांडेकर पुल झोपडपट्टी पुनर्वसन योजना, श्री पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था,
कसबा पेठ (Kasba Peth), आणि ७२१ गुजरात कॉलनी (Gujrat Colony) येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांबाबत आढावा यावेळी घेण्यात आला.

Web Title :- Chandrakant Patil On SRA In Pune | Guardian Minister Chandrakant Patil reviewed the schemes of Slum Rehabilitation Authority (SRA)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सिंहगड रोड पोलिस स्टेशन – वाईन शॉपचालकाला लुटण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार; नागरिक जमा झाल्याने चोरटे पळाले (Video)

Bharatiya Vidya Bhavan-Infosys Foundation | भारतीय विद्या भवनमध्ये 27 एप्रिल रोजी ‘लक्ष्य’ नृत्य कार्यक्रम

Get Together Marathi Film | “गेट टूगेदर’ चित्रपटातील “आभास की भास” या रोमँटिक गाण्याला जावेद अली, प्रियांका बर्वे यांचा स्वरसाज (Video)