Chandrakant Patil | ‘… पण मी पालकमंत्री म्हणून पाणी सोडता येत नाही’ – चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर आणि जिल्ह्यातील पाण्याबाबतचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत (Canal Committee Meeting) घेतला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. पाणी सोडा म्हणून माझ्यावर दबाव असतो. पण पालकमंत्री म्हणून मला पाणी सोडता येत नाही. त्यासाठी चर्चा करुन निर्णय घ्यावा लागतो, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितलं.

भारती विद्यापीठाच्या 28 व्या स्थापना दिनानिमित्त (Bharti University Foundation Day) आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) बोलत होते. या कार्यक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अभय जेरे (Abhay Jere), ज्येष्ठ लेखक डॉ. जयसिंगराव पवार (senior writer Dr. Jaisingrao Pawar), ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथा (senior social activist Shantilal Mutha), कुलपती शिवाजीराव कदम (Chancellor Shivajirao Kadam), प्र-कुलगुरु डॉ. विश्वजीत कदम (Ex-Chancellor Dr. Vishwajit Kadam), कार्याध्यक्ष आनंदराव जाधव, कुलगुरू डॉ. विवेक सावजी (Vice-Chancellor Dr. Vivek Savji), कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, रजिस्टार जी. जयकुमार यांच्यासह इतर मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, उपलब्ध पाणी शेती, पिण्यासाठी आणि उद्योग या तीन प्रमुख कारणासाठी आपण वापरत असतो. त्याचा क्रमही असा असतो की, पिण्यासाठी पाणी, शेतीसाठी पाणी आणि उद्योगासाठी पाणी. याचे दर चार महिन्यांनी गणीत बदलत असते, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पाण्याच्या नियोजनाबाबत कालवा समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जातो. या बैठकीला आमदार, खासदार उपस्थित असतात. ही बैठक फार आधीपासून ठरवता येत नाही. दोन -तीन दिवस आधी बैठकीबाबत ठरते. त्यानंतर प्रेशर सुरु होते. पाणी सोडलं पाहिजे. पण पालकमंत्री म्हणून मला पाणी सोडता येत नाही. त्यासाठी चर्चा करुन निर्णय घ्यावा लागतो, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

पक्षापलीकडे संबंध दुर्मिळ झाले

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, पतंगराव कदम (Patangrao Kadam) यांचे सर्व राजकीय नेत्यांशी पक्षाच्या पलीकडे संबंध होते.
पण आज राजकारणात दुसऱ्या पक्षाची व्यक्ती शत्रू मानण्यासारखी परिस्थिती आहे.
पक्षापलीकडे संबंध दुर्मिळ झाले आहेत. शिव्यांचं भांडार राजकारणात वापरले जात आहे.
आजच्या काळात नवसंशोधनाला पर्य़ाय नाही. नवे शैक्षणिक धोरण व्यवसायाभिमुख आहे.
रोजच्या जीवनात उपयुक्त ठरणारे शिक्षण हा या धोरणाचा भाग असल्याचे पाटील म्हणाले.

संशोधनावर विशेष भर द्यावा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेल्या नवीन
शैक्षणिक धोरणाबात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणानुसार माणसाचे
व्यक्तिमत्त्व घडविण्यासोबत संशोधनावर विशेष भर देण्यात येत आहे.
त्यामुळे विद्यापीठानेही विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title :-  Chandrakant Patil | pune decision water in the district canal committee in the meeting statement of chandrakant patil pune

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uday Samant | उद्योगवृध्दीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन कटीबध्द – उद्योगमंत्री उदय सामंत

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 5 हजार रूपयाची लाच घेताना महिला तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात