Chandrapur ACB Trap Case | चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संजय पाटील यांच्यासह दुय्यम निरीक्षक व कार्यालय अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात

फरार संजय पाटील यांच्या कोल्हापुरातील घरांवर छापे, महागड्या कारसह सोने जप्त

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrapur ACB Trap Case | चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (State Excise Department Chandrapur) अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील Sanjay Jaisingrao Patil (वय-54 मूळ रा. आर.के. नगर, कोल्हापूर) यांनी बिअर शॉपीला परवानगी देण्यासाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकरवी तक्रारदार यांच्याकडून एक लाखाची लाच घेतली. चंद्रपूर एसीबीने मंगळवारी सापळा रचून कारवाई केल्यानंतर अधीक्षक पाटील पसार झाले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्यासह दुय्यम निरीक्षक चेतन खोरोडे (Chetan Khorode) व कार्यालय अधीक्षक अभय खाताळ (Abhay Khatal) हे तीन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले. (Bribe Case)

एसीबीच्या पथकाने कारवाई केल्यानंतर अधीक्षक पाटील पसार झाले असून, एसीबीच्या पथकाने पाटील यांच्या कोल्हापुरातील तीन घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाईत पथकाने पाटील यांच्या घरातून 28 तोळे सोन्याचे दागिने, एक अलिशान कार आणि दोन दुचाकी जप्त केल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईमुळे उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

चंद्रपूर येथील एका व्यावसायिकाने बिअर शॉपीचा परवाना मिळवण्यासाठी नोव्हेंबर 2023 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चंद्रपूर कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, त्याला परवानगी देण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. अखेर व्यावसायिकाने उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांच्याशी संपर्क साधून अर्ज मंजूर करण्याची विनंती केली.

त्यावर खारोडे याने अर्ज मंजुरीसाठी अधीक्षक पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांसाठी एक लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत व्यावसायिकाने चंद्रपुर एसीबी कार्य़ालयात तक्रार केली. त्यानंतर पथकाने मंगळवारी पडताळणी करुन सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना खारोडे याला रंगेहाथ पकडले. पथकाने खारोडे याच्यासह कार्यालय अधीक्षक अभय खताळ या दोघांना अटक केली. मात्र, कारवाईची माहिती मिळताच अधीक्षक संजय पाटील पसार झाले.

तीन घरावर छापेमारी

चंद्रपूर एसीबीने केलेल्या विनंतीनुसार कोल्हापूरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधीक्षक संजय पाटील यांच्या घरावर छापे टाकून झडती घेतली.
उपअधीक्षक सरदार नाळे, पोलीस निरीक्षक बापू साळोखे आणि आसमा मुल्ला यांच्या पथकांनी आर.के. नगर,
शिवाजी पेठेतील काळकाई गल्ली आणि शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथील घरांची झडती घेतली.

आर.के नगर मधील घरातून 28 तोळे सोने, एक अलिशान कार आणि दो दुचाकी पथकाने जप्त केल्या आहेत.
बंगल्याची किंमत सुमारे 80 लाख रुपये आहे.
झडतीचा अहवाल गुरुवारी (दि.9) चंद्रपूर कार्यालयाला पाठवल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hemant Rasane On Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांचं काम दाखवा, हजार रुपये मिळवा; भाजप नेते हेमंत रासनेंची नागरिकांना ऑफर

Beed Crime News | महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण?