Chandrapur Pune Bypoll Election | पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुक होण्याची शक्यता कमी, सूत्रांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrapur Pune Bypoll Election | पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Chandrapur Pune Bypoll Election) होण्याची शक्यता नाही, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. निधनानांतर पुढील निवडणुकीला एक वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ असेल तर निवडणुका घेणं निवडणूक आयोगाला (Election Commission) अनिवार्य असतं. परंतु काही अपवादात्मक परिस्थितीचे कारण पुढे करुन निवडणूक टाळण्याची शक्यता आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) यांच्या निधनानंतर (Death) आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे बाळू धानोरकर ( Congress Balu Dhanorkar) यांच्या निधनानंतर या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. यानंतर काही महिन्यात या जागांसाठी पोटनिवडणूक (Chandrapur Pune Bypoll Election) जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, निवडणूक आयोगाकडून या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्याची कोणतीही हालचाल होत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या दोन्ही जागा आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत (Lok Sabha Elections) रिक्त राहण्याची शक्यता आहे.

गिरीश बापट यांचे 28 मार्च रोजी निधन झाले. तर बाळू धानोरकर यांचे 30 मे रोजी निधन झालं होतं. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपत आहे. मात्र तरी पोटनिवडणुकीची शक्यता नाही. एक वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ शिल्लक असेल तर पोटनिवडणूक घेणं अनिवार्य असतं.

काय आहे नियम?

लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यानंतर लोकसभेच्या कार्यकाळापेक्षा कमी कालावधी उरला असेल तर निवडणूक टाळता येते.
16 जून 2024 ला लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे. यामुळे 16 जून 2023 नंतर या लोकप्रतिनिधींचे निधन झाले असते तर कार्यकाळाचं कारण पुढे करुन निवडणूक टाळता आली असती. परंतु या दोन्ही जागा एकवर्षापेक्षा जास्त काळ अधीच रिक्त झाल्या आहेत. मात्र तरीदेखील या दोनही जागांसाठी लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोटनिवडणुकीची शक्यता संपुष्टात

अपवादात्मक स्थिती आणि कार्यकाळ ही दोन कारण निवडणूक आयोग देऊ शकतात आणि पोटनिवडणूक टाळू शकतात.
यापैकी एक कारण देऊन निवडणूक टाळता येऊ शकते. 29 सप्टेंबरपर्यंत दोन्ही मतदार संघाच्या पोटनिवडणूक जाहीर
होणं अपेक्षीत होतं. निवडणुक आयोगाचा कार्यक्रम किमान 30 ते 35 दिवस आधी जाहीर होते.
मात्र, अद्याप कार्यक्रम जाहीर करण्यात आला नसल्याने पोटनिवडणुकीची शक्यता संपुष्टात आल्याचे समोर आलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | “मी अटकेपासून वाचवले…” छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी दिले प्रतिउत्तर