Sharad Pawar | “मी अटकेपासून वाचवले…” छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी दिले प्रतिउत्तर

पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अनेक नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. अजित पवार गटाची (Ajit Pawar Group) बीडमधील उत्तर सभा प्रचंड गाजली. यामध्ये अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे शरद पवारांवर केलेल्या टीकेचे पडसाद महाराष्ट्रभर पाहायला मिळाले. ‘माझी काहीही चूक नसताना 2003 मध्ये तेलगी प्रकरणात (Telgi Case) शरद पवारांनी माझा गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतला’ असा घणाघात भुजबळांनी शरद पवारांवर केला. यामुळे सभेमध्ये आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये भुजबळांच्या विरोधात आंदोलने देखील झाली. आता यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी त्यांना अटकेपासून वाचवले’ असे उत्तर शरद पवार यांनी दिले आहे.

सध्या मंत्री छगन भुजबळ विरुद्ध शरद पवार (Chhagan Bhujbal vs Sharad Pawar) असे चित्र दिसून येत आङे. बीड मधील सभेमध्ये भुजबळांनी केलेल्या आऱोपावर शरद पवार समर्थकांनी सडेतोड उत्तर दिले असले तरी देखील स्वतः पवारांची यावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सर्व आतुर होते. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भुजबळांच्या आरोपावर व प्रश्नावर उत्तर दिले आहे. शरद पवार म्हणाले की, “त्यावेळी मी छगन भुजबळांचा राजीनामा घेतला नसता तर त्यांना अटक झाली असती. मी त्यांना अटकेपासून वाचवलं.” असे उत्तर शरद पवार यांनी दिले आहे. यावेळी शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचे नाव घेण्याचे टाळणे. नाव न घेता त्यांनी भुजबळांना प्रतिउत्तर दिले आहे.

सभेमध्ये मंत्री छगन भुजबळ हे शरद पवार यांना उद्देशून म्हणाले होते की, “मी पक्षाचा पहिला प्रदेशाध्यक्ष झालो. तेव्हा तुम्ही आणि मीच महाराष्ट्रात दोघेच फिरत होतो. थोडे आमदार कमी पडले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री, तर मी उपमुख्यमंत्री झालो. पण, मला एक कळाले नाही, 23 डिसेंबर 2003 रोजी माझा गृहमंत्रीपदाचा राजीनामा तुम्ही घेतला. तेव्हा त्यात माझी काय चूक होती?”

पुढे भुजबळ म्हणाले की, “तेलगी प्रकरणामध्ये तेलगीला अटक करत त्याच्यावर मोक्का लावण्याचे आदेश मी दिले होते.
तेव्हा तुम्ही मला बोलावलं आणि राजीनामा देण्यास सांगितलं. राजीनामा द्या, असं तुम्ही म्हटलं.
नंतर फोन आला भुजबळांचा राजीनामा घेऊ नका, त्यांची काही चूक नाही. तरीही तुम्ही माझा राजीनामा घेतलाच.
1992-93 आणि 94 साली खैरनार यांनी देखील तुमच्यावर आरोप केले होते.
पण तेव्हा तुमचा राजीनामा कुणीही मागितला नाही.आणि तुम्हीही तो दिला नाही.
मग माझा राजीनामा का घेतला?” असा सवाल उपस्थित करत मंत्री भुजबळ यांनी शरद पवार (Sharad Pawar)
यांच्याबद्दलची मनातील जुनी खदखद बोलून दाखवली. त्यांच्या या गंभीर आरोपानंतर सभेमध्ये तर गोंधळ झाला आणि
नंतर भुजबळांविरोधात आंदोलने देखील झाली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rhea Chakraborty | रिया चक्रवर्तीला मिळाले नवे प्रेम; बिजनेसमॅनला करतीये डेट

Pune Crime News | तडीपार असताना घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांकडून अटक