Chandrashekhar Bawankule | ‘तावडे समितीचा अहवाल खरा आहे का?’ बावनकुळे म्हणाले -‘भाजपात अशी कोणतीही…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते विनोद तावडे (BJP Leader Vinod Tawde) यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election-2024) पार्श्वभूमीवर एक सर्वेक्षण (Survey) करण्यात आलं. यामध्ये त्यांनी दिलेल्या अहवालानुसार निवडणुकीत भाजपची ताकद घटणार असल्याचा दावा केले आहे. या अहवालाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना विचारलं असता त्यांनी या अहवालातील दाव्यांवर भूमिका स्पष्ट केली. भाजपमध्ये अशी कोणतीही तावडे समिती तयार झालीच नसल्याचे स्पष्टीकरण बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, भाजपात अशी कोणतीही तावडे समिती तयार झालीच नाही. समितीच नव्हती, त्यामुळे असा कोणताही अहवालच (Tawde Committee Report) तयार झाला नाही. कुणीतरी आपल्याच मनाने कपोलकल्पित बातम्या (Maharashtra Political News) तयार केल्या आणि जाणीवपूर्वक या बातम्या चालवल्या. भाजपा मागे पडला आहे, असं चित्र निर्माण करण्यासाठी ही बातमी होती.

महाराष्ट्र ड्रग्ज असोसिएशनने (Maharashtra Drugs Association) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहून मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या विभागात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता, ड्रग्ज असोसिएशनने पत्र दिलं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तक्रारीची चौकशी करतील असे त्यांनी सांगितले.

खारघरमधील घटनेसंदर्भात (Kharghar Heat Stroke Case) बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व सरकारमधील सर्व लोक, मंत्री या घटनेकडे लक्ष ठेऊन आहेत.
गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या माध्यमातून रुग्णालयात संपूर्ण व्यवस्था केली जात आहे.
तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे देखील यात लक्ष देत आहेत.
देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे हेही लक्ष ठेऊन असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Web Title :- Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule comment of speculations of vinod tawade report on upcoming loksabha election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’, अजित पवारांचा उल्लेख करत भाजपचा संजय राऊतांवर निशाणा, म्हणाले-‘उद्धव ठाकरे…’

Gulabrao Patil | ‘दोघांची इच्छा आहे, पण अजून तिथी जवळ आलेली नाही’, अजित पवारांच्या बंडखोरीच्या चर्चेवर गुलाबराव पाटलांचा मिश्कील टोला

MP Sanjay Raut | ‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, मी फक्त शरद पवारांचे ऐकणार’, अजित पवारांच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर