Cheating Fraud Case Pune | पुणे : रोज तीन हजार रुपये कमावण्याच्या नादात तरुणीची 16 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Cheating Fraud Case Pune | गुगल रिव्ह्यू प्रीपेड टास्कच्या (Google Review Prepaid Task) माध्यमातून दररोज तीन हजार 200 रुपये कमावण्याचे आमिष दाखवून एका तरुणीची 16 लाख 81 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 13 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घडला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) रविवारी (दि.28) गुन्हा दाखल केला आहे.(Cheating Fraud Case Pune)

याबाबत हिंगणे खुर्द (hingne khurd) येथे राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. यावरुन 74828XXXX मोबाईल धारक, टेलीग्राम ग्रुप अ‍ॅडमीन आणि बँक खाते धारक यांच्यावर आयपीसी 419, 420 सह आयटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीला अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन एक मसेज आला. ऑनलाइन पार्टटाइम जॉब ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे चांगले पैसे कमावता येतील. दररोज 3 हजार 200 रुपये कमावण्याची संधी आहे, असे त्यात म्हटले होते.

तरुणीने काम करण्यास होकार दिल्यानंतर कॉइन डीसीएक्स इंडीया प्रा. लि. कंपनीचे बनावट ऑफर लेटर दिले.
त्यानंतर गुगलवर रिव्ह्यू-रेटिंग देण्याचे काम करण्यास सांगितले. एक टास्क पूर्ण केल्यास 210 रुपये मिळतील, असे सांगितले.
सुरुवातीला मोबदला देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर गुंतवणुकीचे आमिष दाखवून प्रीपेड टास्कच्या नावाखाली एकूण
16 लाख 81 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरल्यानंतर तरुणीला कोणताही परतावा दिला नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने सिंहगड पोलिसांकडे तक्रार केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राघवेंद्रसिंह क्षीरसागर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Cop In Pune | पुणे : दुचाकीस्वाराकडून पोलिसाला शिवीगाळ करुन खुर्चीने मारहाण

Congress Vs BJP | पक्ष, नेते फोडण्यापाठोपाठ आता उमेदवार पळविण्याचा भाजपाचा ‘खेळ’, सूरतनंतर एमपीत काँग्रेस उमेदवाराची माघार, कमळ घेतलं हाती