Cheating Partner | मोठे पाय असलेले लोक फ्लर्ट करण्यात ‘तरबेज’, ‘या’ साईजच्या ‘पंजा’च्या लोकांपासून जरा सांभाळूनच; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Cheating Partner | फसवणारा पार्टनर (Cheating Partner) जर तरबेज असेल तर त्याची फसवेगिरी उघड करणे अवघड होते. परंतु एका सर्वेक्षणानुसार, पार्टनरचे पाय पाहून त्याच्या हेतूचा अंदाज लावता येऊ शकतो. यात दावा करण्यात आला आहे की, छोटे पाय असलेल्या पुरुषांच्या तुलनेत मोठे पाय असलेले जास्त फसवे असतात.

रिपोर्टनुसार, 10 किंवा त्यापेक्षा जास्त साईजचे पाय असलेल्या लोकांची भरकटण्याची शक्यता 7 किंवा यापेक्षा कमी साईजचा पाय असलेल्या लोकांच्या तुलनेत जवळपास दुप्पट असते.
विवाहित जोडप्यासाठी असलेली डेटिंग साइट Illicit Encounters ने सर्वेक्षणाचे आकडे जमवण्यासाठी सुमारे 2,000 लोकांना प्रश्न विचारले होते.

या सर्वेक्षणात पंज्याच्या साईजच्या आधारावर लोकांच्या वर्तणाबाबत सांगण्यात आले आहे.
रिपोर्टनुसार, जर मनुष्याच्या पायाची साईज 13 किंवा यापेक्षा जास्त असेल तर तो फसवण्याची शक्यता 21 टक्के असते आणि जर पायाची साईज 12 असेल तर फसवण्याची शक्यता 22 टक्केपर्यंत वाढू शकते.

अशाप्रकारे 10 साईजचा पंजा असलेले 25 टक्के लोक फसवे असू शकतात. तर या सर्वांना मागे टाकत 11 नंबर वाले 29 टक्के लोक फसवे निघू शकतात.
डेटिंग साईटच्या प्रवक्ता (Dating site spokeswoman) जेसिका लियोनी (Jessica Leoni) यांनी याबाबत म्हटले, मोठे पाय असलेले पुरुष जास्त उंच असतात.
यासाठी कदाचित अशा लोकांना जास्त अटेन्शन मिळते. (Cheating Partner)

34 वर्षाच्या जेरेमी कॉलिन्सच्या पंजाची साईज 8 आहे आणि त्यांनी कधीही आपल्या पार्टनरला फसवले नाही. त्यांनी म्हटले, ही सन्मानाची बाब आहे.
यामुळे काहीच फरक पडत नाही की, माझ्या पंजाची साईज किती आहे.

 

तर 39 वर्षाच्या गॅरेथ कॉनेली यांच्या पंजाच्या साईज 12 आहे आणि ते म्हणतात, मी माझ्या यापूर्वीच्या पार्टनरला फसवले होते.
परंतु मला वाटत होते की, माझ्या डोळ्यांमुळे असे होते. आता मला समजले आहे की, यासाठी माझे पायसुद्धा जबाबदार असू शकतात. (Cheating Partner)

 

Web Title : Cheating Partner | men with big feet have affairs more than those with small ones says study

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर

CNG Price Pune | पेट्रोल डिझेल पाठोपाठ आता CNG त 2 रुपयांनी वाढ भाववाढ; जाणून घ्या नवे दर

Pune Crime | ‘तू मोठा की मी मोठा’ ! भोरमध्ये पुण्यातील तरुणाचा दगडाने ठेचून खून, नुकताच आला होता कारागृहातून बाहेर