Chemist Association of Pune District | संघटना आवश्यक; एकटा व्यावसायिक टिकणार नाही – जगन्नाथ शिंदे

पुणे डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संदीप पारख, सचिवपदी अनिल बेलकर, खजिनदारपदी रोहित करपे, संघटक सचिवपदी रोहित जोशी यांची निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Chemist Association of Pune District | एकटा व्यक्ती, एकटा व्यावसायिक फार काळ टिकू शकत नाही. एकत्र नाही आलात आणि असच पुढे चालू राहिले तर, येणाऱ्या काळात 40-50 % रिटेलर सुद्धा टिकणार नाहीत. त्यामुळे एकता ठेवा आणि संघटनेवर विश्वास ठेवून एकत्र या, असे प्रतिपादन ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे (Jagannath Shinde) यांनी केले. (Chemist Association of Pune District)

पुणे डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनच्या पदग्रहण सोहळा आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

जगन्नाथ शिंदे म्हणाले की, ऑनलाइन फार्मसी जवळ जवळ बंद करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. आणि आता आपण डीप डिस्काउंट सारख्या गोष्टींवर सुद्धा आळा घालू. केमिस्ट व्यावसायिकांच्या भविष्याचा अचूक वेध घेत संघटना काम करत असल्याचे त्यांनी संगितले. (Chemist Association of Pune District)

यावेळी पुणे डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संदीप पारख (Sandeep Parakh), सचिवपदी अनिल बेलकर (Anil Belkar), खजिनदारपदी रोहित करपे (Rohit Karpe), संघटक सचिवपदी रोहित जोशी (Rohit Joshi) यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे Maharashtra State Chemists and Druggists Association (MSCDA) सचिव अनिल नावंदर (Anil Navandar) , महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख अजित पारख (Ajit Parakh) यांच्यासह पुणे (Pune News), पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि जिल्ह्यातील सुमारे तीन हजार केमिस्टच्या उपस्थित ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती झाली आहे.

नवनियुक्त अध्यक्ष संदीप पारख यांनी सर्वांचे आभार मानले. 20 वर्ष या क्षेत्रात काम करत आहे, यापुढे सुद्धा चांगले काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

केमिस्ट असोसिएशन डिस्ट्रिक्ट पुणेचे सचिव अनिल बेलकर यांनी 2018-23 या
वर्षांचा अहवाल सादर केला. कोरोना काळात पुणे जिल्ह्यात सर्वात प्रभावी काम झाल्याचे त्यांनी संगितले.

विजय पाटील आणि अनिल नावंदर यांनी केमिस्ट व्यवसायाचे बदललेले स्वरूप
तसेच भविष्यामध्ये येणार्‍या ऑनलाइन फार्मसी आणि डीप डिस्काउंट
सारख्या समस्यांची पूर्वकल्पना दिली. याचसोबत अडचणींवर मात कशी करता येईल
हे सुद्धा संगितले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी आणि क्रीडापटूंचा सत्कार करण्यात आला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Modi Visit Pune | माजी आमदार अरविंद लेले कुटुंबीयांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांची सदिच्छा भेट!