स्टॅलिन बनले करुणानिधींचे वारसदार

चेन्नई : वृत्तसंस्था

द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) च्या अध्यक्षपदी एम.के.स्टॅलिन यांची निवड झाली. चेन्नईत झालेल्या पक्षाच्या सर्वसाधारण बैठकीत स्टॅलिन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. द्रमुकचे अध्यक्ष एम.करुणानिधी यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा कोणाकडे जाणार यावरून कुटुंबात वाद सुरु झाला होता. करुणानिधी यांचे मोठे पुत्र एम. के. अलागिरी यांनी आपणच त्यांचे खरे वारस असल्याचा दावा केला होता. मात्र आज झालेल्या बैठकीत पक्षाच्या सदस्यांनी स्टॅलिन यांनाच निवडून दिले.

गेल्या काही वर्षांपासून पक्षाची धुरा अप्रत्यक्षपणे स्टॅलिन यांच्याकडेच होती. स्टॅलिन यांचा राजकीय प्रवास वयाच्या १४व्या वर्षी सुरु झाला होता. त्यांनी लहान वयातच वडिलांचा प्रचार सुरु केला होता.  एम.के. स्टॅलिन हे दीर्घकाळापासून करुणानिधींसोबत पक्षाचे कामकाज पाहत होते. स्टॅलिन यांनी चेन्नईचे महापौरपद आणि तामिळनाडूचे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांची डीएमकेचे कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1c46c004-aad3-11e8-b99a-e1f72b62136a’]

अध्यक्ष पदावर करुणानिधी यांनी ५० हून अधिक वर्षे ताबा ठेवला होता डीएमकेला एकत्र ठेवण्याचे आव्हान स्टॅलिन यांच्यापुढे आहे . स्टॅलिन यांच्या समोर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे सर्वात पहिले आव्हान असेल. विशेष म्हणजे स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने एकदाही विजय मिळवलेला नाही. २०११, २०१४ आणि २०१६च्या निवडणुकीच त्यांचा पराभव झाला होता.
लोकसभेच्या सर्व जागा शिवसेना स्वबळावर लढणार
फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य कार्यालयीन इमारतीत या महापूजेचे आयोजन करण्यात आलं होतं. या पूजेनंतर कॉलेज प्रशासन धार्मिक रुढीचं उदात्तीकरण करत आहे, असा आरोपही विद्यार्थी संघटनांनी केला होता.