Chhagan Bhujbal | ‘बार्टी’ कडून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची फेलोशिप बंद, छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chhagan Bhujbal | डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (बार्टी-BARTI) वतीने पीएचडी (PhD) व एमफिल (MPhil) करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप (Fellowship) दिली जाते. 2013 पासून सुरु असलेली फेलोशिप सरकारने थांबविल्यामुळे विद्यार्थी तसेच बहुजन समाजात संतापाचे वातावरण आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्राद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.

राज्य सरकारने बार्टी संस्थेद्वारे संशोधनासाठी वितरीत केली जाणारी संशोधन फेलोशिप बंद केली आहे. याशिवाय इतर योजनांच्या निधीमध्ये देखील कपात केली आहे. या विरोधात संशोधक विद्यार्थी 50 दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन (Agitation on Azad Maidan) करत आहेत. परंतु शासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला असल्याची माहिती छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.

बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने
पीएचडीसाठी देण्यात येणारी फेलोशिप बंद करण्यात आल्याने बहुजन समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण
प्राप्त करण्यापासून वंचित राहणार आहेत.
हे विद्यार्थी ग्रामीण आणि दुर्गम भागातून प्रचंड कष्ट करून आणि आपली गुणवत्ता सिद्ध करून या पीएचडी शिक्षणापर्यंत पोहोचले आहेत.
ही फेलोशिप न मिळाल्यामुळे त्यांच्या भवितव्यावर परिणाम होईल.
त्यामुळे बार्टी अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पीएचडी फेलोशिप योजना पूर्ववत सुरू करण्यात यावी,
अशी मागणी पत्राद्वारे बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती छगन भुजबळ यांनी ट्वीट करुन दिली.

Web Title :-   Chhagan Bhujbal | barti fellowship of students from bahujan samaj closed chhagan bhujbals letter to chief minister

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘अजित पवारांकडून जिवाला धोका’, भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले -‘माझ्याकडून धोका असू शकतो, पण…’

Deepak Kesarkar | ‘दमानियांना मी उत्तर द्यायला लागलो तर…’, अजित पवारांच्या भाजपासोबत जाणाच्या वक्तव्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया