Chhagan Bhujbal | छगन भुजबळांना ‘पुन्हा’ अंडासेल दाखवण्याची वेळ आली आहे, ‘त्या’ वादग्रस्त विधानावरुन भाजपचा इशारा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा? असे वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी भाजपकडून (BJP) त्यांच्यावर सडकून टीका होत आहे. त्यातच भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) थेट अंडा सेल (Anda Cell) दाखवण्याची वेळ आल्याचे भोसले यांनी म्हटले आहे. इतकंच काय तर भुजबळ हे राष्ट्रवादीचे ओवैसी (Asaduddin Owaisi) आहेत, असा घणाघात भोसले यांनी केला आहे.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अशी भूमिका मांडून तमाम हिंदूंचा अपमान केला आहे.
राज्यात हिंदुत्ववादी सरकार आल्यामुळे विषारी गरळ ओकून हिंदुंमध्ये गोंधळ निर्माण करायचा आणि दंगली भडकवायच्या असा त्यांचा कट आहे.
माफी न मागून आपल्या हिंदुविरोधी भूमिकेवर ठाम राहणाऱ्या शरद पवार (Sharad Pawar) या हस्तकाला पुन्हा एकदा अंडा सेल दाखवण्याची आता वेळ आली आहे, अशा शब्दात आचार्य भोसले यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

छगन भुजबळांचे स्पष्टीकरण

छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, हे वक्तव्य मी ज्या दिवशी बोललो,
त्या दिवशी सत्यशोधक समाजाचा (Satyashodhak Samaj) आदर करण्याचा कार्यक्रम होता.
मला माझे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. देशाविरोधात बोललो असतो तर ती वेगळी गोष्ट आहे.
मी हेच बोललो होतो की, शाहू, फुले, आंबेडकरांनी आपल्याला शिकवले, त्यांचा आदर करायला हवा.
त्यांची पूजा करायला हवी, असे माझे म्हणणे होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

आपल्याला सरस्वतीने काही शिकवले नाही, त्यामुळे सरस्वती पूजनाचा प्रश्न येतोच कुठे.
फुले, शाहू, आंबेडकर, आण्णासाहेब कर्वे (Annasaheb Karve) यांनी महिलांच्या शिक्षणासाठी मोठे काम केले.
कोणाचे फोटो काढा किंवा लावा, असं मी म्हणालो नव्हतो.
मात्र माझ्या वक्तव्याचा राजकीय मुद्दा बनवला जातो आहे. मी देखील हिंदूच आहे, हिंदुंसाठी बरीच कामे केली आहेत.
देवीच्या दर्शनाला देखील जातो.
पण देवीऐवजी महापुरुषांचा सन्मान होणे गरजेचे आहे, असे भूजबळ यांनी म्हटले.

Web Title :- Chhagan Bhujbal | chhagan bhujbal controversial statement about goddess sarasvati bjp gives warning of jail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uday Samant | उदय सामंतांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेची तुलना बाळासाहेबांच्या सभेसोबत, आदित्य ठाकरेंना नाव न घेता लगावला टोला