Chhagan Bhujbal Death Threat | हिशोब बरोबर होणार… मंत्री छगन भुजबळ यांना ठार मारण्याची धमकी

नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी (Chhagan Bhujbal Death Threat) देण्यात आली आहे. ही धमकी त्यांना व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे (WhatsApp Message) मिळाली आहे. तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) तपास सुरू केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, नाशिकमध्ये जेव्हा ते आपल्या घरी होते, तेव्हा त्यांना धमकी (Chhagan Bhujbal Death Threat) देण्यात आली. धमकीत म्हटले आहे की, हिशोब बरोबर होणार. टीव्ही ९ ने हे वृत्त दिले आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, धमकीचा मेसेज मराठीत पाठवण्यात आला आहे. यामध्ये त्यांना योग्य वर्तन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच म्हटले आहे की, ते जास्त दिवस जीवंत राहणार नाहीत. जर हा इशारा मानला नाही तर हिशोब बरोबर केला जाईल. धमकीच्या या मेसेजबाबत अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर नाशिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मात्र, हा मेसेज कुठून आणि कोणत्या नंबरवरून पाठवण्यात आला हे अद्याप समजलेले नाही.
काही दिवसापूर्वी एनसीबीचे माजी झोनल चीफ समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना सुद्धा मारण्याची धमकी
देण्यात आली होती. (Chhagan Bhujbal Death Threat)

बांगलादेशी कट्टरतावाद्यांकडून समीर वानखेडे यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.
समीर वानखेडे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर चेर्चेत आले होते. सध्या ते चेन्नईत कार्यरत आहेत.
धमकी आल्यानंतर त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात (Goregaon Police Station) तक्रार दाखल केली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Inspector Promotion ACP / DySP | राज्यातील 104 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उपअधीक्षक पदी बढती