Chhagan Bhujbal | घरे-दारे जाळणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार का? भुजबळांचा सरकारला सवाल, उद्या ओबीसींची सरकारी बंगल्यावर बैठक

मुंबई : Chhagan Bhujbal | ओबीसींवर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जातंय याचा अभ्यास करावा लागेल. सरसकट सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी मान्य केली आहे. पण ज्यांनी घरे-दारे जाळली त्यांच्यावरील गुन्हे मागे घेणार का? असा सवाल मंत्री छगन भुजबळांनी आपल्याच सरकारला विचारला आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच सरकारवर निशाणा साधला आहे. (Chhagan Bhujbal)

जरांगे आणि राज्य सरकारवर (Maharashtra Govt News) टीका करताना छगन भुजबळ म्हणाले, सरकारी भरती करायची नाही, जागा राखीव ठेवायच्या, पण किती जागा ठेवायच्या? पुनर्विचार याचिका न्यायालयात आहे तोपर्यंत मराठा समाजातील सर्वांना १०० टक्के शिक्षण मोफत करायचे. पण मराठाच का? ओबीसी, दलित, आदिवासी, ओपन या सर्वांनाच द्या मोफत आरक्षण द्या. ब्राम्हण समाजालाही द्या.

छगन भुजबळ म्हणाले, उद्या पाच वाजता बी ६, सिद्धगड येथे माझ्या सरकारी निवासस्थानी बैठक आहे.
ओबीसी, दलित, आदिवासी समाजातील नेत्यांनी बैठकीला यावे. कोणतेही पक्षाचे आणि संघटनांनी यावे. पक्ष आणि संघटनेचा अभिनिवेश सोडून या कामासाठी सिद्धगड बंगल्यावर या. आपण चर्चा करूया.

छगन भुजबळ म्हणाले, या बैठकीत कोणालाही कमी लेखले जाणार नाही. केवळ ओबीसी विषयावरच चर्चा होईल.
आरक्षणप्रश्नी पुढे काय पावले उचलायची यासंदर्भात निर्णय घेण्याकरता ही बैठक असेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Alandi Crime | खळबळजनक! आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाकडून तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

Maratha Reservation | मराठा आरक्षण लढ्याला यश ! सर्व मागण्या मान्य, सरकारने अखेर अध्यादेश काढला, विजयी सभा लवकरच

Maratha Reservation | मराठा आरक्षणातील ‘सगेसोयरे’चा अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमातींनाही फायदा; काय नेमके म्हटले आहे अध्यादेशात, कसा होणार इतरांनाही फायदा, जाणून घ्या

Pune Viman Nagar Crime | अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूरच्या विराज रविकांत पाटील याच्यावर पुण्यात गुन्हा; पिस्तूल डोक्याला लावून धमकावले

पुणे : तरुणीला मारहाण करुन अंगावरील कपडे फाडले, सात जणांवर FIR

पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन विनयभंग, अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा