Pune Alandi Crime | खळबळजनक! आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाकडून तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Alandi Crime | आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या एका नामांकित वारकरी संस्था चालकाने संस्थेतील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर-आळंदीकर (वय- 52) याच्यावर बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो अॅक्ट) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून मुलांवर आरोपी हा अत्याचार करत होता, अशी माहिती आळंदी पोलिसांनी (Alandi Police) दिली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आळंदी शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (Pune Alandi Crime )

संबंधित वारकरी संस्था ही खूप जुनी असून नुकतीच ती नोंदणीकृत झाली आहे. मृदुंग वादनाच्या शिक्षणासाठी ही संस्था प्रसिद्ध असून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या संस्थेतून शिक्षण घेतले आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी संबंधित संस्था चालवणाऱ्या तथाकथित महाराजाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करुन अटकेची कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या संस्थेत 70 मुले वारकरी शिक्षण घेतात. त्यापैकी, गेल्या 15 दिवसांपासून तीन अल्पवयीन मुलांना एकांतात बोलावून
त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलांनी त्यांच्या पालकांना ही
बाब सांगितल्यानंतर हा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरामुळे आळंदी परिसरात तीव्र संताप्त प्रतिक्रिया उमटली
आहे. पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करुन दोषी व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मंदिरात दान करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला लुटले, धायरी येथील प्रकार

Pune Congress News | काँग्रेसने केले आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन; लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट – माजी नगरसेवक दत्ता बहिरट

Manoj Jarange Patil | जरांगे यांनी सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या, तोपर्यंत सर्व शिक्षण मोफत करा, सरकारने रात्रीपर्यंत…

Deepak Kesarkar | जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा निघाला?, मंत्री केसरकरांनी केले मोठे वक्तव्य