Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | एकुलत्या एका मुलाचा विरह सहन न झाल्याने आईने उचलले ‘हे’ पाऊल

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाईन – छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar Crime News) एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आपल्या एकुलत्या एक मुलाने आत्महत्या (Suicide) केल्यामुळे त्याच्या आईला याचा विरह सहन न झाल्याने आईनेदेखील मुलाच्या पाठोपाठ आत्महत्या केली आहे. पैठण तालुक्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar Crime News) शिवनाई गावामध्ये हि धक्कादायक घटना घडली असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. रितेश रमेश काळे (वय 17 वर्षे, रा. शिवनाई, पैठण) असे मुलाचे तर रुखमनबाई रमेश काळे असे आत्महत्या करणाऱ्या आईचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पैठण तालुक्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar Crime News) शिवनाई येथील अकरावी वर्गात शिक्षण घेत असलेल्या रितेश रमेश काळे (Ritesh Ramesh Kale) या विद्यार्थ्याने २ मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रितेश हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. यानंतर आपल्या एकुलत्या एका मुलाचे दुःख सहन न झाल्याने रितेशची आई रुखमनबाई रमेश काळे (Rukhmanbai Ramesh Kale) यांनीदेखील बुधवारी दुपारी आपल्या राहत्या घरातील बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे (Bidkeen Police Station)
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, सतीश बोडले, राहुल बल्लाळ, संजय चव्हाण, घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी तातडीने रुखमनबाई काळे यांना बिडकीन ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल केले मात्र त्या
ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गोरे (Medical Officer Dr. Sanjay Gore) यांनी त्यांना मृत
घोषित केले. रुखमाई काळे यांच्या माघारी पती, एक मुलगी असा परिवार आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title :- Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | a son ended his life the mother also committed suicide as she could not bear the separation
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Jalgaon ACB Trap | 5 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी तलाठयासह कोतवाल अॅन्टी करप्शनच्या जाळयात