Video : शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज ( 19 फेब्रुवारी) जगभरात साजरी होत आहे. शिवजयंतीनिमित्त सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत असून उत्साह पाहायला मिळत आहे. जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर देखील राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. जन्मोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, छत्रपती संभाजीराजेही उपस्थित असून शिवप्रेमींचा उत्साह शिगेला आहे.

 

 

 

 

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवजयंती कार्यक्रमासाठी सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. राज्य सरकारने नियमावली काढून शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यंदा शिवजयंतीला कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवप्रेमीमध्ये थोडी नाराजी होती. शिवजयंतीनिमित्त राज्यभरातून शिवज्योत घेऊन शिवभक्त दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर जातात. मात्र यंदा कोरोनामुळे किल्ल्यावर शिवप्रेमींनी जमू नये यासाठी कलम 144 लागू केले आहे. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवनेरी शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे.