Chicago News | इयत्ता 5 वी व त्यावरील मुलांसाठी मोफत कंडोमची व्यवस्था करा, शिकागो प्रशासनाचा शाळांना आदेश

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था Chicago News | अमेरिकेतील (America) शिकागो (Chicago) या शहरातील शाळांसाठी एक धक्कादायक आदेश जारी करण्यात आला आहे. 2020 च्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार (New educational policy) इयत्ता 5 वीपासून पुढच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी निरोधची (Condom) व्यवस्था करण्याचं तेथील प्रशासनाने या आदेशात म्हटलं आहे. अर्थात 10 वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांना कोंडमची (Condom) व्यवस्था करावयास लागणार आहे. शासनाच्या अशा आदेशानंतर समाज माध्यमांवर तीव्र संताप होताना दिसत आहे. नागरिक या आदेशाला विरोध करीत आहेत. तसेच हा निर्णय लाजिरवाणी असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. Chicago News | chicago schools provide free condoms students young 10 years old

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

मुलांमधील लैंगिक आजार, HIV संसर्ग आणि अनावश्यक गर्भधारणा रोखण्याचा यामागील तर्क असल्याचे प्रशासनाने सांगितलं आहे. हे धोरण डिसेंबर 2020 मध्ये तयार केलं होतं.
परंतु, कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने हा निर्णय अंमलात आणण्यात आणला गेला नाही.
शिकागो सार्वजनिक शाळा शिक्षण मंडळाच्या नव्या धोरणानुसार इयत्ता 5 वीपासून पुढच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत कंडोमची व्यवस्था करावी लागणार आहे.

या दरम्यान, कोरोनाच्या महामारीनानंतर आता पुढच्या महिन्यापासून शिकागोत शाळा सुरु होणार आहेत.
एका सोशल मीडिया वापरकर्त्याने हा निर्णय मानसिक आजारपणाचे लक्ष असल्याचे म्हटले.
तर, या देशाला अखेर काय झालंय? असा सवाल केला आहे.
अँण्ड्र्यू पोलक (Andrew Pollock) या व्यक्तीने ट्विटरद्वारे म्हटले आहे की, ‘शिकागो एलिमेंट्री (Chicago Elementary) शाळांमध्ये मोफत कंडोमची (निरोध) व्यवस्था करेल.
परंतु, गँग्जच्या विरोधात कारवाईबाबत काय मत आहे? कारण, मुले शाळांमध्ये गोळीबाराच्या भयाशिवाय मुक्तपणे शाळेत जाऊ शकतील.
या ट्विटवरून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Web Title : Chicago News | chicago schools provide free condoms students young 10 years old

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात; ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान

Bandra Cyber Police | कॅनडात नोकरी लावतो म्हणून ‘फेक कॉल सेंटर’द्वारे महिलेचे 15 लाख उकळले; पोलिसांनी आरोपीला कोलकात्यातून उचलले

Rohit Pawar | ‘खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवय’; रोहीत पवारांची फडणवीसांवर टीका