Curfew in Goa : ‘कोरोना’ नियंत्रणासाठी गोवा 31 मे पर्यंत बंद; कर्फ्यूत वाढ

पणजी : वृत्तसंस्था –  राज्यात सध्या अस्तित्वात असलेला कर्फ्यू हा येत्या 31 मे पर्यंत कायम असेल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घोषणा केली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरु असतील. दरम्यान, राज्यात वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या पाहता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी गोव्यात 9 मे पासून 23 मे पर्यंत कर्फ्यू लावण्यात आला होता. कर्फ्यूच्या काळात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे.

गोवा सरकारनं वैद्यकीय सेवेस परवानगी दिली आहे. तसेच किराणा मालाच्या दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. याव्यतिरिक्त रेस्टॉरंट द्वारे डिलव्हरीला परवानगी असेल. ज्यात ऑर्डर घेण्यासाठी सकाळची वेळ निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, 23 मे रोजी संपणारा कर्फ्यू आता 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. यावेळीही पूर्वी जारी केलेले कडक नियमच कायम राहतील, असं गोवा सरकारने स्पष्ट केलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, किराणा मालाची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत खुली राहितील. रेस्टॉरंट्सच्या टेकअवे ऑर्डसाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत परवानगी आहे. तसेच दुसऱ्या राज्यातून किंवा परदेशातून गोव्यात येणाऱ्या लोकांचा कोविड-19 चा रिपोर्ट निगेटीव्ह असणे आनिवार्य करण्यात आले आहे.