Child Artist Rahul Koli Passed Away | 10 वर्षीय ‘या’ प्रसिद्ध बालकलाकाराचे कर्करोगाने निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजराती ‘छेल्लो शो’ (‘Chello Show’) या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारणारा अभिनेता राहुल कोळीचे निधन (Child Artist Rahul Koli Passed Away) झाले आहे. हा चित्रपट यंदा भारताकडून ऑस्करसाठी (Oscars) पाठवण्यात आला आहे. अभिनेता राहुल कोळीचे वय अवघे 10 वर्षे होते. राहुलच्या निधनाने (Child Artist Rahul Koli Passed Away) अनेकांना मोठा धक्काच बसला आहे.

राहुल कोळी हा गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी (Cancer) झुंज देत होता. अखेर शेवटी कर्करोगाशी असणारा त्याचा लढा अपयशी ठरला आणि त्याची प्राणज्योत मावळली. गेल्या काही दिवसांपासून राहुलला सतत ताप येत होता. तसेच त्याला रक्ताच्या उलट्याही होत होत्या अशी माहिती राहुल कोळीच्या वडिलांनी दिली आहे. राहुलचा एक खास चित्रपट तीन दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र, त्या अगोदरच राहुलची प्राणज्योत मावळली (Pass Away) आहे. राहुलच्या अशा अचानक जाण्याने त्याचा चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

राहुलने अवघ्या 10 वर्षांमध्ये बालकलाकार म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
राहुलने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. राहुलच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राहुलचा चित्रपट 14 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

Web Title :- Child Artist Rahul Koli Passed Away | this famous child artist passed away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा