नेपाळच्या राजकारणात चीनचा हस्तक्षेप, ओली यांना बाजूला करत प्रचण्ड यांना सत्ता देण्याची तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेपाळच्या राजकारणात सध्या राजकीय उलथा-पालथ सुरू आहे. एकीकडे जिथे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या शिफारसीवर रविवारी प्रतिनिधी सभा बरखास्त करण्यात आली तर सत्तारूढ नेपाळ कम्युनिस्ट पार्टी दोन भागात विभागली आहे. पाटीचा एक भाग ओली यांच्या समर्थनात उभा आहे तर दुसरा भाग पुष्प कमल दहल ’प्रचण्ड’ यांच्यासोबत जाण्यास तयार आहे. नेपाळच्या राजकारणात आता चीनने सुद्धा एंट्री मारली आहे. कम्युनिस्ट पार्टीचे दोन भाग झाल्यानंतर चीन आपले एक उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ काठमांडूला पाठवत आहे. चीनचे प्रतिनिधी मंडळ नेपाळच्या राजकारणात आपल पकड मजबूत करणे आणि नेपाळ कम्युनिस्ट पार्टीत झालेल्या विभाजनाचा परिणाम कमी करण्याचे काम करेल.

चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या परराष्ट्र विभागाचे सर्वात वरिष्ठ व्हाईस मिनिस्टर गुओ येझोऊ चार सदस्यीय प्रतिनिधी मंडळासोबत धिमंडल यांच्यासोबत काठमांडूला पोहचत आहेत. गुओ येझोऊ कम्युनिस्ट पार्टीत होत असलेल्या विभाजनाला पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतील. कम्युनिस्ट पार्टीचे विभाजन चीनसाठी एखाद्या मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही. नेपाळच्या कम्युनिस्ट पार्टीवर चीनचा पूर्णपणे कंट्रोल होता. कम्युनिस्ट पार्टीच्या विभाजनानंतर नेपाळच्या सत्तेत चीनची पकड ढीली पडताना दिसत आहे.

नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळासाठी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना चीन दोषी मानत आहे. चीनला आता ओली यांना सत्तेतून बेदखल करायचे आहे आणि प्रचण्ड यांना पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसवायचे आहे, जेणेकरून ओली यांच्या गटात असलेले नेते प्रचण्ड यांच्याकडे जावेत आणि ओली एकदम एकाकी पडावेत.

नेपाळमधून मिळालेल्या वृत्तानुसार, चीनचे प्रतिनिधी मंडळ पुष्प कमल दहल ’प्रचण्ड’ यांच्यासोबत, माधव नेपाळ यांच्यासह अनेक न्यू कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांना भेटेल. अशाच प्रकारे चीनचे प्रतिनिधी मंडळ उपराष्ट्रपती नंद किशोर पुन, स्पीकर अग्नी प्रसाद सापकोटा, माजी स्पीकर कृष्ण बहादुर महरा यांची देखील भेट घेईल.