मुकेश अंबानी नाही तर चीनचे ‘हे’ उद्योगपती ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना पाठिमागे टाकत चीनमधील उद्योगपती झोंग शानशान हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. झोंग हे ‘वॉटर किंग’ म्हणून ओळखले जातात. त्यांची यावर्षी नेटवर्थ 70.09 अब्ज डॉलर वरून 77.8 अब्ज डॉलर झाली आहे. झोंग हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेतच याशिवाय त्यांनी चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ‘अलीबाब’चे संस्थापक जॅक मा यांना देखील मागे टाकले आहे.

झोंग शानशान हे बाटलीबंद पाणी आणि कोरोनाची लस तयार करण्याच्या व्यवसायात सक्रीय आहेत. झोन हे जास्त प्रकाश झोतात आलेले नाहीत. त्यांची माध्यमांमध्ये कमी चर्चा झाली. पत्रकारिता, मशरुमची शेती आणि आरोग्य सेवा सारख्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामामुळे ते आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहत. त्यांनी चिनी तंत्रज्ञानाच्या एका समूहाशी हातमिळवणी केली असून यामध्ये मुकेश अंबानी आणि जॅम मा यांचा देखील समावेश आहे.

ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सनुसार, यंदाच्या वर्षी झोंग यांची संपत्ती वाढून 77.8 बिलियन झाली असून त्यांच्या संपत्तीत वेगाने वाढ होत आहे. 66 वर्षीय झोंग यांना चीनच्या बाहेर त्यांना कमी लोक ओळखतात. चीनमध्ये त्यांना ‘लोन वुल्फ’ या नावानेही ओळखले जाते. एप्रिलमध्ये त्यांनी बिजिंग वेन्टाई बायोलॉजिल फर्मासी इंटरप्रायजेस कंपनी सुरु केली. त्यानंतर त्यांनी बाटली बंद पाणी तयार करणारी नोंगफू स्प्रिंग कंपनी उभारली. ही कंपनी हाँगकाँगमध्ये सर्वात लोकप्रिय ठरली.