Chitale Bandhu Mithaiwale | चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे 20 लाखाच्या खंडणीची मागणी; नामांकित शाळेतील शिक्षीकेसह चौघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  एफडीए (FDA) आणि पुणे पोलिसांकडे (Pune Police) तक्रार देण्याची धमकी देऊन चितळे बंधू मिठाईवाले (Chitale Bandhu Mithaiwale) यांच्याकडे वीस लाख रुपयांची खंडणी (Ransom) मागणी प्रकरणात पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Crime Branch Police) शिक्षिकेसह (Lady Teacher) चौघांना अटक (Four Arrest) केली.
अटकेतील महिला ही महिला एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका (English Medium Lady Teacher) आहे.
चितळे बंधू मिठाईवाले (Chitale Bandhu Mithaiwale) यांच्याकडून 20 लाखाची खंडणी (Ransom) मागणार्‍यांना अटक केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. Demand for ransom of Rs 20 lakh from Chitale Bandhu Mithaiwale; Four arrested, including a reputed school teacher

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुनम सुनिल परदेशी (वय 27) (Poonam Sunil Pardeshi), करण सुनिल परदेशी (वय 22) (Karan Sunil Pardeshi)आणि सुनील बेनी परदेशी (वय 49) (Sunil Beni Pardeshi) व अक्षय मनोज कार्तिक (वय 27) Akshay Manoj Karthik अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.
याबाबत चितळे डेअरीचे (Chitale Dairy) सहाय्यक मार्केटिंग व्यवस्थापक नामदेव बाबुराव पवार (वय 62) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली आहे.

पुनम परदेशी (Poonam Pardeshi) ही शिक्षिका आहे.
तिने 2 जूनला चितळे बंधू मिठाईवाले (Chitale Bandhu Mithaiwale) यांच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे ई-मेलद्वारे (E-Mail), प्रत्यक्ष आणि फोनद्वारे (Via Phone Call) तक्रार (complaint)दिली होती.
की, तुमच्या दुधात काळा रंगाचा पदार्थ आढळला आहे.
तुमच्या विरोधात एफडीए (FDA) व पुणे पोलिसांकडे (Pune Police) तक्रार करते.
हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा.
नाहीतर तुमचे दुकान बंद करू.
तुमची बदनामी करू अशा धमक्या देत प्रथम 5 लाख रुपये खंडणीची (Ransom) मागणी केली होती.
त्यानंतर परत परत बोलून त्यांनी 20 लाख रुपये खंडणी मागणी केली होती.

या सर्व प्रकारानंतर चितळे डेअरीचे (Chitale Dairy) नामदेव पवार (Namdev Pawar) यांनी पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांनी तक्रारीची शहानिशा करून आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला.
दोन हजाराच्या बनावट नोटा असलेले वीस लाख रुपयाचे बंडल पोलिसांनी फिर्यादीजवळ दिले.
आणि हेच पैसे स्वीकारत असताना तिघांना रंगेहात पकडले.
त्यानंतर त्यांचा साथीदार अक्षय कार्तिक याला देखील मुंढवा येथून ताब्यात घेतले आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला ‘झळ’ बसणार; जुलैमध्ये ‘या’ वस्तू 10 टक्क्यांनी महागण्याची शक्यता

सुनील परदेशी (Sunil Pardeshi), करण परदेशी (Karan Pardeshi) आणि अक्षय कार्तिक (Akshay Karthik) हे सराईत गुन्हेगार (Criminals) असून. त्यांच्यावर यापूर्वीदेखील गुन्हे (FIR) दाखल आहेत.
दरम्यान, पुनम (Poonam Pardeshi) ही एका नामांकित शाळेत शिक्षिका (School Teacher) म्हणून काम करते.
तर सुनील परदेशी (Sunil Pardeshi) व करण परदेशी (Karan Pardeshi) यांचा लॉंड्रीचा व्यवसाय आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस अप्पर आयुक्त अशोक मोराळे (Additional CP Ashok Morale) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव (Police Inspector Bharat Jadhav) , उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad) , सुनील कुलकर्णी (PSI Sanil Kulkarni) , पोलीस कर्मचारी अजय थोरात (Police Ajay Thorat) , अमोल पवार (Police Amol Pawar) , इम्रान शेख (Police Imran Shaikh) , महेश बामगुडे (Police Mahesh Bamgude) , मीना पिंजन (Meena pinjan) यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title : Chitale Bandhu Mithaiwale | Demand for ransom of Rs 20 lakh from Chitale Bandhu Mithaiwale; Four arrested, including a reputed school teacher

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Good News For Farmers | ‘या’ सरकारचा 2.46 लाख शेतकर्‍यांना मोठा दिलासा, तब्बल 980 कोटींचे कर्ज केलं माफ