Choosing Career Option | बारावीनंतर करिअर निवडत असाल तर या आहेत काही महत्त्वपूर्ण एक्सपर्ट्सच्या टिप्स

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Choosing Career Option | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) बारावीचा (HSC) निकाल नुकताच लागला. यामध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. दहावी (SSC) व बारावीला करिअरचा पाया मानला जातो. दहावी व बारावीनंतर करिअरची अनेक दारे विद्यार्थ्यांसाठी खुली होतात. निकालानंतर विद्यार्थी व पालकांच्या मनात करिअर ऑप्शन (Choosing Career Option) काय आहेत आणि काय निवडावे? याबद्दल विचार सुरु होतात. मात्र ह्या ऑप्शनपैकी योग्य पर्याय निवडण्यासाठी काही टिप्स विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही लक्षात घेतल्या पाहिजेत.

करिअरची (Career) निवड करताना पहिले प्राधान्य आवडीच्या क्षेत्राला (Interest) दिले पाहिजे. तुम्हाला काय करायला आवडतं आणि पुढे तेच करिअर म्हणून करायला आवडेल का ? याचा विचार करा. हे तुम्हाला तुमच्या कौशल्य आणि आवडीशी जुळणारी करिअर निवडण्यात मदत करेल. तुमच्या आवडीची सर्व क्षेत्रं त्याच्या गुणवत्तेनुसार व आजच्या काळातील त्याच्या उपयुक्ततेनुसार कागदावर लिहा, त्यानंतर करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी कोणता कोर्स सर्वोत्तम (Best Course) असेल ते ठरवू शकता. पण नेहमीच तुम्ही निवडलेलं क्षेत्रं चांगलं असेलच असे होत नाही. आणि याचा प्रत्यय अनेकदा त्या क्षेत्रात गेल्यावर किंवा शिक्षण (Education) सुरू केल्यावर येतो व आपला रस नाही हे लक्षात येते. अशा वेळी एक्सपर्ट्सच्या (Experts) म्हणण्यानुसार प्लॅन B (Plan B) असणे फार गरजेचे असते. आवडीचे क्षेत्राचे शिक्षण घेऊनही त्यात करिअरच्या चांगल्या सोयी नसल्यास किंवा स्कोप नसल्याचे म्हणजेच जॉबच (Job) मिळत नसल्यास हा दुसरा पर्याय कामी येऊ शकतो. अशा प्रसंगी खचून न जाता प्लॅन B कार्यरत करणे गरजेचे असते.

प्लॅन B म्हणजे नक्की काय तर करिअर निवड करताना तुम्ही अशा दोन क्षेत्रांची निवड करा ज्यामध्ये तुम्हाला शिकायला करिअर करायला आवडेल.
मात्र प्लॅन B चं क्षेत्रं हे अधिक प्रभावी असणं आवश्यक आहे.
प्लॅन B चं क्षेत्रं निवडताना तुम्ही तुमच्या छंदांशी निगडित कोणतंही क्षेत्रं निवडू शकता.
तुमच्याकडे प्लॅन B असेल तर तुम्हाला तुम्ही शिक्षण घेत असलेलं क्षेत्रं आवडलं नाही किंवा त्या क्षेत्रामध्ये रस नसेल
तर तुम्ही प्लॅन B च्या क्षेत्राकडे केव्हाही वळू शकता.
त्याचप्रमाणे अचानक तुमचा जॉब गेला तर नैराश्यात न जाता पुढील पर्यायाचा विचार करता येतो.
आधीच्या क्षेत्रातून योग्य वेतन न मिळाल्यास तुम्ही प्लॅन B च्या क्षेत्रातून पैसे कमावू शकता.
आयुष्यभरात स्थैर्य हवे असल्यास व आजच्या नवीन तंत्रज्ञानामुळे बेभरवशाच्या नोकरीवर पूर्णपणे अवंलबून न
रहता प्लॅन B असणं हे तुमच्या आणि करिअरच्या फायद्याचं आहे. यातून तुम्हाला एक्सट्रा इन्कमही येऊ शकते
तसंच तुम्हाला बॅकअप म्हणूनही या प्लॅन B चा फायदा होऊ शकतो.
मग आताच बिंधास तुमच्या आवडीचे करिअर तसेच तयार ठेवा तुमचा प्लॅन B.

Web Title :  Choosing Career Option | Here are some important tips from experts if you are choosing a career after 12th

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shubman Gill | शुभमन गील आणि सचिन तेंडूलकरचा हितगुज करताना फोटो व्हायरल; नेटिझन्सनच्या भन्नाट कमेंट्स

NCP Chief Sharad Pawar | ‘नव्या संसद भवनाची इमारत बांधताना…’ शरद पवारांचा गंभीर आरोप

Sambhajiraje Chhatrapati | स्वराज्य संघटना राज्यातील सर्व निवडणुका लढवणार, संभाजीराजेंची मोठी घोषणा (व्हिडिओ)