NCP Chief Sharad Pawar | ‘नव्या संसद भवनाची इमारत बांधताना…’ शरद पवारांचा गंभीर आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचं (New Parliament Building) उद्घाटन होणार आहे. परंतु यावरुन विरोधक आक्रमक झाले आहे. या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन करावं अशी मागणी विरोधकांनी केली आहे. अशातच शनिवारी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी नव्याने बांधण्यात आलेल्या संसद भवनावरुन मोदी सरकारवर (Modi Government) गंभीर आरोप केला आहे. संसद भवन बांधताना विश्वासात न घेतल्याचा आरोप शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केला आहे.

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, मी अनेक वर्षापासून राज्यसभेचा सदस्य (Rajya Sabha Member) आहे. आम्ही ज्या संसद भवनात बसतो तिथे नवी वास्तू बांधायची हे वृत्तपत्रात वाचलं. असा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर संसदेतील सदस्यांशी चर्चा करायची आणि त्यांना विश्वासात घेण्याची आवश्यकता होती. भूमिपूजन केलं, त्यासाठी विश्वासात घेतलं नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

शरद पवार पुढे म्हणाले, आता इमारत तयार झाली तर उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या उपस्थित होत असते, ही पद्धत आहे. पण त्यांनी तेही केलं नाही. ज्या प्रकारे कार्यक्रम चालला आहे. त्याची चर्चाही कधीच केली नाही. त्यामुळे कुणाला विश्वासात न घेता निर्णय घतेल आहे. आता विरोधी पक्षाच्या काही विरिष्ठ नेत्यांनी आपली भूमिका घेतली, त्याला माझा पाठिंबा असल्याचे पवार म्हणाले.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी शिवसेना पक्षाची
घटना (Shivsena Party Constitution) ही विधीमंडळ किंवा दोन्ही गटाऐवजी निवडणूक आयोगाकडून
(Election Commission) मागवली असल्याचे सांगितले जात आहे. त्याबद्दल शरद पवार यांना विचारण्यात आले.
यावर बोलताना ते म्हणाले, याचा अर्थ असा आहे, की निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
अंतिम निर्णय आल्यावर प्रतिक्रिया देणं योग्य होईल.

Advt.

Web Title :  NCP Chief Sharad Pawar | ncp president sharad pawar strongly criticized on central government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘मविआची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत’, भाजप आमदाराची जहरी टीका (व्हिडिओ)

Assistant Police Inspector (API) Death Due To Heart Attack | दुर्देवी ! मुलाच्या लग्नासाठी हक्क रजेवर असताना सहाय्यक पोलिस निरीक्षकास हार्टअटॅकने मृत्यू

Maharashtra Politics News | बच्चू कडूंच्या दाव्यामुळं भाजप, शिवसेना अडचणीत, राणांचं टेन्शन वाढलं