Chrisann Pereira | खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकलेली अभिनेत्री क्रिसन परेरा भारतात परतली; शारजाह तुरुंगातून झाली सुटका

पोलीसनामा ऑनलाइन – ‘सडक 2’ (Sadak 2) फेम अभिनेत्री क्रिसन परेरा (Chrisann Pereira) ही मागच्या महिन्यामध्ये अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अडचणीमध्ये आली होती. मात्र UAE च्या अधिकाऱ्यांनी तिची या ड्रग्ज प्रकरणात (Chrisann Pereira) सर्व आरोपांपासून मुक्तता (Chrisann Pereira Exoneration From Charges) केली आहे. सुडबुद्धीने तिच्याशी असे वागण्यात आले होते ही बाब आता समोर आली आहे. अभिनेत्री क्रिसन परेरा (Chrisann Pereira Drug Case) हिला शारजाह तुरुंगातून सुटका (Chrisann Pereira Released Sharjah Jail) करण्यात आली असून ती आता मुंबईमध्ये परतणार (Chrisann Pereira Return In Mumbai) आहे. आल्यानंतर ती मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर (IPS Vivek Phansalkar) यांचीही भेट घेणार आहे.

अभिनेत्री क्रिसन परेरा हिला खोट्या केस मध्ये अडकवण्यात आले होते. तिचे नाव देखील ट्रेलर ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले होते. मात्र ही केस खोटी असून तिला पॉल अँथनी याने जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी तिच्यासोबत असे केल्याचे समोर आले. यानंतर मुंबई क्राइम ब्रँचने (Mumbai Police Crime Branch) या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून अभिनेत्रीला निर्दोष सिद्ध केले आहे. आता तिची शारजाह तुरुंगातून सुटका करण्यात आली असून ती मुंबईमध्ये परतणार आहे. लखीमपुरचे गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त गौतम यांनी तिच्या मुंबईमध्ये परतण्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. क्रिसन सह गुन्हे शाखेचे पथकाने आज (दि.3) सकाळी 11.30 वाजता मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे.

अभिनेत्री क्रिसन परेरा (Chrisann Pereira) हिला तिच्या ब्रोकर पॉल अँथनी (Paul Anthony)
या मित्राने वेबसिरीजच्या ऑडिशनचे कारण सांगत तिच्याकडे ड्रग्ज दिले होते. शहर गुन्हे शाखेने ब्रोकर पॉल अँथनी आणि त्याचा साथीदार राजेश भोभाटे (Rajesh Bhobhate) उर्फ रवी आणि ड्रग्ज तस्कर शांतीसिंह राजपूत (Shantisinh Rajput) यांना 1 एप्रिल रोजी शारजाह येथे एका वेब सिरीजसाठी बनावट ऑडिशन्स घेऊन क्रिसन परेरा हिला ड्रग्ज पाठवल्याप्रकरणी अटक केली होती.

मात्र तपासादरम्यान, आरोपीने वैमनस्यातून क्लेटन रॉड्रिग्ज (Clayton Rodriguez),
मोनिशा डिमेलो (Monisha DiMello), हृषिकेश पांड्या (Hrishikesh Pandya)
आणि केन रॉड्रिग्ज (Ken Rodriguez) या चार पीडितांवर अशाच प्रकारे ड्रग्ज दिल्याचे उघड झाले.
आता अभिनेत्री क्रिसन परेरा हिची मुक्तता झाली असून तिचे नाव
ट्रेलर ब्लॅकलिस्टमधूनही काढून टाकण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | बलात्कार व पोक्सोच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता