Pune Crime News | बलात्कार व पोक्सोच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बलात्कार (Rape) आणि पोक्सो (POCSO Act) गुन्ह्यातील आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता (Acquittal) केली आहे. याप्रकरणी 19 जुन 2016 रोजी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलीला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तिला पळून घेऊन जाऊन बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी सूरज झुंबर कामलिंगे (Sooraj Zhumbar Kamlinge) व त्याला पळून जाण्यास मदत करणारा आरोपी लक्ष्मण मोरे (Laxman More) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. (Pune Crime News)

पीडित मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याने आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा स्पेशल कोर्टात (Special Court) चालवण्यात आला. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्या वतीने 14 साक्षीदार तपासण्यात आले. तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सचिन झालटे (Adv. Sachin Zalte) व अ‍ॅड. अजित गंडाळ (Adv. Ajit Gandal) यांनी न्यायालयात बाजू मांडली. (Pune Crime News)

सरकारी पक्षाने पीडितेचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे हे दाखवण्यासाठी दिलेला पुरावा
पुरेसा नसल्याने आरोपीच्या विरोधात पॉक्सो कलम लागत नाही.
तसेच बलात्काराचा गुन्हा सिद्ध होत नाही, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी कोर्टात केला.
आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन स्पेशल कोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Adah Sharma | केरला स्टोरी फेम अभिनेत्री अदा शर्माची तब्येत ढासळली;
हॉस्पिटलमध्ये तातडीने केले ॲडमिट