ट्रम्प यांनी Twitter वर ज्या प्रसिद्ध मॉडलला केले होते ब्लॉक, तिला फॉलो करत आहेत जो बायडेन; परंतु आला ट्विस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हॉलीवुड सिंगर जॉन लेजेंडची पत्नी आणि प्रसिद्ध मॉडल Chrissy Teigen ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विटरवर अनफॉलो केले आहे. ही पहिली वेळ नाही जेव्हा राष्ट्राध्यक्षांनी (Potus) ट्विटरवर क्रिसीला अनफॉलो केले आहे. मात्र, यावेळी क्रिसीने स्वत:च राष्ट्रध्यक्षांना असे करण्यास सांगितले होते. मंगळवारी क्रिसीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना एक वेगळीच रिक्वेस्ट केली होती.

क्रिसीने केली होती बायडेन यांना विनंती
क्रिसीने एका ट्विटद्वारे जो बायडेन यांना म्हटले होते की, त्यांनी तिला मायक्रो ब्लॉगिंग साईटवरून अनफॉलो करावे. क्रिसीने ट्विट केले की, जेव्हापासून Potus (अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे ट्विटर हँडल) यांनी मला फॉलो केले आहे मी मोजकीच ट्विट केली आहेत. परंतु, जर मला माझ्यासारखी ट्विट करायची असतील तर माझी तुम्हाला विनंती आहे की, कृपया तुम्ही मला अनफॉलो करा. यामध्ये तुमचा काही दोष नाही, ही फक्त माझी विनंती आहे.

ट्रम्प यांनी केले होते क्रिसीला ब्लॉक
डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात Chrissy Teigen ने त्यांच्या विरोधात अनेक ट्विट केले होते, ज्यामुळे ती मागील चार वर्षापासून राष्ट्राध्यक्षांच्या अकाऊंटमधून ब्लॉक होती. जो बायडेन राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर क्रिसीने त्यांना ट्विट करून अनब्लॉक करण्यास सांगितले होते. तिने ट्विट केले होते, हॅलो जो बायडेन मी राष्ट्राध्यक्षांद्वारे मागील चार वर्षांपासून ब्लॉक आहे, तुम्ही कृपया मला फॉलो करू शकता का. क्रिसीचे हे ट्विट मान्य करत जो बायडेन यांनी POTUS च्या अकाऊंटवरून तिला फॉलो केले होते.

मात्र, आता क्रिसीचे मन बदलले आहे आणि तिला उघडपणे आपल्या मनातील गोष्टी ट्विटरवर मांडायच्या आहेत, मात्र कदाचित राष्ट्राध्यक्ष तिला फॉलो करत असल्याने तिला ते करता येत नसावे. राष्ट्राध्यक्षांनी तिला अनफॉलो केल्यानंतर तिने आनंद व्यक्त करत लिहिले की, आता ती स्वतंत्र आहे. सोबतच तिने काही अपशब्दांचा वापर सुद्धा केला होता, ज्या वरून दिसते की, आता तिला आपल्या भाषेच्या वापरापूर्वी जास्त विचार करावा लागणार नाही.