CIBIL Score | जर तुमचा क्रेडिट स्कोअर सुद्धा 700 पेक्षा जास्त असेल तर LIC देईल कर्जावर मोठी सूट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जर तुमचा सिबिल स्कोअर (CIBIL Score) 700 च्या वर असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. LIC Housing finance कमी व्याजदरावर होम लोन (Home loan) देत आहे. एलआयसी हौसिंग फायनान्सने नवीन ग्राहकांसाठी व्याजदर कमी करून 6.90 टक्के केला आहे. Home loan वर हा आतापर्यंतचा सर्वात कमी व्याजदर आहे. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर  (CIBIL Score) 700 किंवा यापेक्षा जास्त असेल त्यांना या रेटवर लोन मिळेल.

कशावर ठरतो तुमचा सिबिल स्कोअर

एखाद्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर यावर अवलंबून असतो की, त्याने अगोदर कोणते कर्ज घेतले आहे किंवा नाही आणि जर घेतले आहे तर त्याची परतफेड वेळेवर केली आहे किंवा नाही.
सिबिल स्कोअरची चौकशी करताना काही इतर बाजू सुद्धा लक्षात घेतल्या जातात.

जाणून घ्या लोनचे लिमिट आणि व्याजदर

एलआयसी हौसिंग फायनान्सनुसार सिबिलमध्ये 700 किंवा त्यापेक्षा जास्त स्कोअर असलेल्या ग्राहकांसाठी 50 लाख रुपयांपर्यंत Loan वर व्याजदर 6.90 टक्केपासून सुरू होईल.
इतक्याच स्कोअरसह 80 लाख रुपयांपेक्षा जास्त लोन घेणार्‍यांसाठी 7 टक्के व्याजदर असेल.

 

असा चेक करा सिबिल क्रेडिट स्कोअर

– सिबिलची वेबसाइट https://www.cibil.com/ वर जा आणि पेजच्या डावीकडे टॉप कॉर्नरमध्ये ‘गेट युअर सिबिल स्कोअर’ वर क्लिक करा.

– ते तुम्हाला सबस्क्रीपशन ऑपशनच्या पेजवर घेऊन जाईल. फ्री ऑपशनसाठी स्क्रोल डाऊन करा.

– आता अकाऊंट क्रिएट करा आणि आवश्यक डिटेल भरल्यानंतर ‘एक्सेप्ट अँड कंटीन्यू’ वर क्लिक करा.

– आपली ओळख येथ व्हेरिफाय करावी लागते.

– जो मोबाइल नंबर दिला आहे, त्यावर एक वन टाइम पासवर्ड (ओटीपी) मिळेल. ओटीपी नोंदवा आणि कंटीन्यूवर क्लिक करा.

– डॅशबोर्डवर जा तुमच्या एन्रॉलमेंटला दुजोरा दर्शवत तुम्हाला नवीन विंडोवर नेले जाईल.

– याबाबत तुम्हाला ई मेल सुद्धा पाठवला जाईल. आपला क्रेडिट स्कोअर चेक करण्यासाठी ‘गो टू डॅशबोर्ड’ वर क्लिक करा.

–  सिबिल स्कोअर पाहण्यासाठी तुम्हाला माय स्कोअर डॉट सिबिल डॉट कॉमवर नेले जाईल.
येथे तुम्ही आपला फ्री सिबिल स्कोअर आणि सिबिल रिपोर्ट पाहू शकता.

 

Web Title : CIBIL Score | lic housing finance get cheap loan offer to customers with 700 plus cibil score how to check

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तस्करांना गुन्हे शाखेकडून अटक, 32 लाखाचा मुद्देमाल जप्त

Diabetes | ‘ही’ वनस्पती ‘डायबिटीज’च्या रूग्णांसाठी लाभदायक, 2 तासात ब्लड शुगर लेव्हल होईल कमी; जाणून घ्या

Maharashtra Rains | ठाणे, पुणे आणि कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा; रत्नागिरीत ‘Orange Alert’ जारी