CM Eknath Shinde| ‘हा’ महामार्ग माझ्यासाठी लकी; काम सुरू झालं तेव्हा मंत्री आणि आता… एकनाथ शिंदेंनी केल्या आठवणी ताज्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गावर गाडी चालवून या महामार्गाची तपासणी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यांनी यावेळी अनेक किस्से सांगितले आहेत.

त्यापैकी एक किस्सा म्हणजे समृद्धी महामार्ग प्रकल्प सुरू झाला तेव्हा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सांगतात, ‘समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडण्यात आली तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी मी मंत्री होतो आणि माझ्याकडे एमएसआरडीचे खातं होतं, त्यावेळी महामार्गाची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे विश्वासाने ही जबाबदारी दिली होती. काम सुरू झालं तेव्हा मी मंत्री होतो आणि आता मी मुख्यमंत्री आहे याचा मला आनंद वाटतो.’

शिंदे म्हणतात, ‘हा महामार्ग माझ्यासाठी लकी आहे, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. हा प्रकल्प अजिबात सोपा नव्हता, यासाठी अनेक अडचणी होत्या.
हा प्रकल्प सुरू करताना एमएसआरडीसीवर साडेसहा कोटी कर्ज होते.
प्रचंड अथक प्रयत्नांतून हा प्रकल्प सुरू झाला.
केंद्रातून सर्व परवानग्या लगेच मिळत गेल्या त्यामुळे प्रकल्प इतक्या लवकर पूर्ण झाला आहे.
‘ समृद्धी महामार्ग राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावेल, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.

Web Title :-CM Eknath Shinde | devendra fadnavis then showed faith eknath shinde told that story samruddhi mahamarg

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बोलू देत आम्हाला घेणे-देणे नाही; आमचे मुख्यमंत्री तोंड कधी उघडणार?’ – संजय राऊत

NCP Leader Ajit Pawar | ‘अरे गोपीचंदा काय बोलतो’ असे म्हणत पडळकरांच्या वक्तव्यावर अजित पवारांची टोलेबाजी; अनेक मुद्द्यांवर मांडले मत

Mumbai Crime | देवाचा प्रसाद देतो असे सांगून 60 वर्षीय वृद्धाने केला 11 वर्षीय मुलीवर बलात्कार

Supreme Court | लष्करात महिलांसोबत भेदभाव; सर्वोच्च न्यायालयाने केंद्रासह लष्कराचे कान टोचले