CM Eknath Shinde In PM Modi Sabha | आताची लढाई ही महायुती आणि महाविकास आघाडीमधील नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरूद्ध परदेशात देशाची बदनामी करत फिरणारे राहुल गांधी यांच्यामध्ये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – CM Eknath Shinde In PM Modi Sabha | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाकडे घोडदौड करत आहे. अनेक देशांचे प्रमुखही त्यांचे कौतुक करतात. राष्ट्राला महासत्ता करण्याचे वचन देखिल ते पुर्ण करतील. त्यामुळे आताची लढाई ही महायुती आणि महाविकास आघाडीमधील नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरूद्ध परदेशात देशाची बदनामी करत फिरणारे राहुल गांधी यांच्यामध्ये आहे. यासाठीच महायुतीच्या उमेदवारांना (Mahayuti Candidates) मत म्हणजे मोदींना मत असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. (Pune Lok Sabha)

पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), बारामतीच्या (Baramati Lok Sabha) उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), शिरूरचे (Shirur Lok Sabha) उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आणि मावळचे (Maval Lok Sabha) उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांच्या प्रचारार्थ रेसकोर्स (Pune Race Course) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले.

भाषणाच्या सुरवातीलाच शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनता आतुर असल्याचे सांगत मोदींच्या राज्यातील सर्वच सभा रेकॉर्डब्रेक होत असल्याचे सांगितले. प्राण जाए पर वचन न जाए अशी मोदींची कार्यपद्धती आहे. ३७० कलम हटवून दाखवलं. राममंदीर उभारले. मोदींच्या रक्तात देशभक्ती भिनलेली आहे. राष्ट्राला महासत्ता करण्याचे वचन देखिल ते पुर्ण करतील. ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे. या देशात मोदींची ग्यारंटी चालते. या उलट कॉंग्रेसने साठ वर्षात देश बुडविला. देशाला विकासाकडे अग्रेसर करण्यासाठी महायुतीच्या चारही उमेदवारांना विजयी करा असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.

मोदींनी स्वत:ला भ्रष्टाचाराचा डाग लागू दिला नाही

कॉंग्रेसने साठ वर्षात देश बुडविला. विरोधकांकडे फक्त भ्रष्टाचाराची ग्यारंटी आहे.
याउलट मोदींनी आतापर्यंत स्वत:ला भ्रष्टाचाराचा एक डागही लागू दिला नाही.
मोदींच्याकडे विकासाची ग्यारंटी आहे. पुणेकर हुशार आहेत. येत्या ७ मे आणि १३ मे ला महायुतीच्या उमेदवारांना
मतदान करून विरोधकांची हवा काढतील, असा विश्‍वास आहे. – एकनाथ शिंदे

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Cop In Pune | पुणे : दुचाकीस्वाराकडून पोलिसाला शिवीगाळ करुन खुर्चीने मारहाण

Congress Vs BJP | पक्ष, नेते फोडण्यापाठोपाठ आता उमेदवार पळविण्याचा भाजपाचा ‘खेळ’, सूरतनंतर एमपीत काँग्रेस उमेदवाराची माघार, कमळ घेतलं हाती