CM Eknath Shinde – MLA Sanjay Shirsat | मुख्यमंत्री निवास ’वर्षा’वरील स्नेहभोजनाला एकनाथ शिंदे गटाचे औरंगाबादचे आ. संजय शिरसाट जाणार नाहीत; चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde – MLA Sanjay Shirsat | शिंदे गटात (Shinde Group) सर्वकाही अलबेल नसल्याची आणखी एक बातमी समोर येत आहे. या बातमीमुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. शिवसेनेतील बंडखोरीत साथ देणार्‍या बंडखोर आमदारांना (Rebel MLA) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर (Varsha Bungalow) स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले आहे. या स्नेहभोजनाला सर्व आमदार, मंत्री उपस्थित राहणार असले तरी शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट जाणार नसल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. (CM Eknath Shinde – MLA Sanjay Shirsat)

 

संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांच्यावर सध्या नाराज आहेत. त्यांना मंत्रिमंडळाच्या (Cabinet) पहिल्या विस्तारात डावलण्यात आले होते. शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. शिवाय जाहीरपणेही त्यांनी तसे व्यक्तव्य केले होते. यानंतर दुसर्‍या मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. मात्र दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची चर्चा सुरू झाल्याने नाराजांमधील नाराजी आणखी वाढल्याचे बोलले जात आहे. बंडखोर आमदारांना एकत्र आणण्यासाठी शिंदे यांनी स्नेहभोजनाचा बेत केला आहे. मात्र या स्नेहभोजनाला संजय शिरसाट जाणार नाहीत.

दरम्यान, याबाबत आमदार संजय शिरसाट म्हणाले की, मतदारसंघात पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी स्नेहभोजनाला उपस्थित राहणार नाही. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पूर्वपरवानगी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पूर्वपरवानगीनेच मी मतदारसंघातील कार्यक्रमांना जाणार आहे. त्यामुळे नाराजी वैगेरे काहीही नाही. माध्यमांमधून गैरसमज पसरवण्यात येत आहेत. मी सोमवारीच वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

 

शिरसाट पुढे म्हणाले की, स्नेहभोजनाची सर्व चौकशी मी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना भेटून केली.
त्यामुळे तो कार्यक्रम आमचाच आहे. मी गेलो नाही म्हणून मोठे काहीतरी घडत आहे असे नाही.
इतके महत्त्वाचे असेल तर मी साडेसहाचे विमान पकडून मुंबईला जाईन.
मी नाराज असल्याच्या बातम्या जर अशा येणार असतील तर मला स्नेहभोजनाला जावेच लागेल.
नाराजीचा प्रश्न नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कुठलीही चर्चा नाही. त्यावर मी अधिकारवाणीने बोलू शकत नाही.
ज्यावेळेला विस्तार व्हायचा तेव्हा होईल. जो एकनाथ शिंदे निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असे शिरसाट म्हणाले.

 

Web Title :- CM Eknath Shinde – MLA Sanjay Shirsat | at the dinner on varsha bungalow by cm eknath shinde auarangabad shivsena mla sanjay shirsat will not go

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा रविवारी बंद राहणार

 

PM Kisan 12th Installment | पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, ‘या’ 10 स्थितीत मिळणार नाही पैसा

 

Ganeshotsav 2022 | पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जन संदर्भात दाखल केलेली याचिका हाय कोर्टाने फेटाळली